भोकर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त झाले संविधान वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका,शहर,युवक शाखा भोकर व राष्ट्रवादी ओबीसी विभाग जिल्ह्याच्या वतीने संविधान पूजन, वाचन आणि वाटपाचा उपक्रम संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या औचित्याने दि.२३ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका,शहर,युवक आणि ओबीसी विभाग शाखा भोकर च्या वतीने भोकर मध्ये संविधान पुजन, उद्देशिका वाचन व विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना संविधान प्रतिंचे वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका शाखा संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष आनंद डांगे यांसह आदींनी संविधान पुजन केले. यानंतर तालुका सचिव महेंद्र कांबळे यांनी संविधानाची उद्देशिका वाचन केली व मनोगतातून संविधानाचा गाभा उपस्थितांना समजावून सांगितला.त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव,लहु,फुले,शाहू,आंबेडकर,अण्णा भाऊ यांच्या विचारावर चालणारा असून संविधानाला मनापासून मानणारा असल्याची भावना व्यक्त केली.त्यानंतर पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून भोकर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,पोलीस ठाणे,तालुका कृषि अधिकारी कार्यालय,वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,शासकीय ग्रामीण रुग्णालय,दुय्यम निबंधक कार्यालय,नगर परिषद व महा.विद्युत वितरण कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रतिंचे वाटप करुन महापुरुषांच्या नावाचा जयघोष केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण असंघटीत कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,नांदेड जिल्हा सरचिटणीस रवी गेंटेवार,जिल्हा सरचिटणीस चेतन पाटील सोनारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तर सदरील स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,तालुका सचिव महेंद्र कांबळे,शहराध्यक्ष फईम पटेल,ओबीसी जिल्हा सरचिटणीस सतिश चटलावार,तालुका उपाध्यक्ष राजू पांचाळ,तालुका उपाध्यक्ष प्रकाश बोन्दीरवाड,तालुका उपाध्यक्ष गजू पाटील सोळंके,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष निलेश खांडरे,शहर कार्याध्यक्ष अविनाश आलेवार,युवक शहराध्यक्ष मोहम्मद मझहरोद्दीन,सामाजिक कार्यकर्ते संदीप नरवाडे,ओबीसी तालुका उपाध्यक्ष नामदेव जाधव यांसह आदींनी परिश्रम घेतले.