Wed. Dec 18th, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ‘लाडक्या भाऊ-बहिणींना’ किमान वेतन २० हजार रु.द्यावेत!

Spread the love

भोकर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ‘लाडक्या भाऊ-बहिणींनी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले विविध मागण्यांचे निवेदन…

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर तालुक्यातील अनेक युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करत असून प्रशिक्षण पुर्ण झालेल्यांना कायमस्वरूपी शासकीय नौकरीत समाविष्ट करुन घेऊन किमान २० हजार रुपये वेतन द्यावे, यांसह आदी मागण्यांसंदर्भात दि.९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना ता.भोकर च्या वतीने राज्याचे नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक,युवतीच्या मागण्या पुर्ण करण्या बाबत महाराष्ट्र शासन,कौशल्य,रोजगार,उ‌द्योजकता व नाविन्यता विभाग शा.नि.क्र.संकिर्ण २०२४/प्र.क.९०/व्यशी-३,दि.०९ जुलै २०२४ अन्वयेचा संदर्भ देत भोकर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.त्या निवेदनाद्वारे म्हटले आहे की,सर्व आस्थापनावर अनेकजण गेल्या ६ महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय नौकरीत कायम स्वरुपी रुजू करावे,तसेच त्यांनी केलेल्या अन्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत. १)नियमानुसार काम व दरमहा किमान विद्यावेतन हे ५ तारखेच्या आत मिळाले पाहिजे.२)युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कायद्यानुसार किमान वेतन २० हजार रुपये(वेतन/मानधन)देण्यात यावे.३)काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच वि‌द्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्यती कार्यवाही करावी.४) सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना कायमस्वरुपी रोजगार, स्वंयरोजगार,उपलब्ध करून द्यावा व प्रशिक्षण देऊन वाऱ्यावर सोडु नये.५)प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायम करावे. ६)शासकिय आणि निमशासकिय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्रद्यकीय रजा दिल्या जातात,त्या प्रमाणे आम्हालाही देण्यात याव्यात.७)वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १० टक्के राखीव जागा ठेवाव्यात.
याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात म्हटले होते की,लाडके भाऊ व लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल. त्यामुळे युवक,युवतींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.ह्या आशेचे रुपांतर निराशेत होऊ नयेत म्हणून युवक व युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देऊन महाराष्ट्रालाही उन्नत करावे,असे म्हटले आहे.उपरोक्त मागण्यांचे निवेदन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार व भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.सदरील निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना ता. भोकरच्या वतीने प्रा.एच एम भोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आले असून त्या निवेदनावर तालुका समन्वयक पी.पी.श्रीमलवार,तालुकाध्यक्ष मंगेश देशमुख,उपाध्यक्ष मारोती चरकेवाड,सचिव साईप्रसाद जळपतराव,प्रसिद्धी प्रमुख शिवकुमार प्रेमुलवाड,बाळू कोकूलवार,किशन बोईनवाड,अमित भांगे,मानसिंग तौर,आशा बोकारे,वर्षा शेळके यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !