Sat. Dec 21st, 2024

अठरा पगड रयतेने साजरा केला ‘महाराजांचा’ भव्य-दिव्य जन्मोत्सव सोहळा

Spread the love

भोकर मधील विविधतेने सजलेल्या शोभायात्रेतील ‘शिवकालीन मर्दानी खेळ’ ठरले विशेषाकर्षण!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ढोल,ताशा,बँड पथक,भजनी मंडळ,अश्व, अश्वारूढ देखावे,पारंपरिक वेशभुषेतील महिला,पुरुष, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सर्व जाती,पंथ,धर्मीय सहभागी अठरा पगड रयतेने सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला असून विविधतेने सजलेल्या शोभायात्रेतील ‘शिवकालीन मर्दानी खेळ’ हे विशेषाकर्षण ठरले आहेत.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती भोकर च्या वतीने भोकर शहरातील सर्व मुख्य रस्ते भगवे पताके व ध्वजांनी सजविण्यात आले होते.सोमवार,दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे १२:०५ वाजता(मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याची ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य आतिषबाजीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.तर सकाळी ९:०० वाजता मासाहेब जिजाऊ चौक भोकर येथे ध्वजारोहण करण्यात आले व तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर पर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.यानंतर महंत प्रभाकर कपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आणि याच ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले.अनेक दात्यांनी दान केलेले रक्त संकलन श्री गुरु गोविंदसिंग शासकीय रक्त पेढी नांदेड यांनी केले.यावेळी भोकर चे नुतन तहसिलदार सुरेश घोळवे,जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,सुभाष पाटील किन्हाळकर,बहुजन नेते नागनाथ घिसेवाड,ओबीसी नेते नामदेव आयलवाड,प्रा.डॉ.व्यंकट माने, डॉ.यु.एल.जाधव,माधव अमृतवाड,किशोर पाटील लगळूदकर, ॲड.शिवाजी कदम,गणपत पिट्टेवाड,आत्रिक पाटील मुंगल, शंकर पाटील बोरगावकर,बालाजी शिंदे,संपादक उत्तम बाबळे, सुरेश बिल्लेवाड,सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती चे अध्यक्ष संदिप पाटील गौड व सर्व पदाधिकारी,असंख्य शिव प्रेमी यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दुपारी १२:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथून रथारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत ग्रामीण भागातून आलेले भजनी मंडळ,ढोल-ताशा पथक,बँड पथक, आदिवासी नृत्य पथक, बंजारा डफडी पथक,गोंधळी पथक, डीजे,अश्व,अश्वारुढ देखावे,पारंपरिक वेशभूषाधारी मावळे, महिला,पुरुष,तरुण, तरुणी,सर्व धर्मीय हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते.तर या शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण ठरले ते कोल्हापूर येथील ‘शिवकालीन मर्दानी खेळ’ पथक.या पथकाने लाठी,काठी,तलवारबाजी,दांडपट्टा,युद्धकला, आत्मसंरक्षणार्थचा हल्ला,प्रतिहल्ला यांसह आदींची प्रात्यक्षिके सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.तर ढोल ताशा,बँड, शिवरायांची गिते व पोवाड्यांवर तरुणाईने ठेका धरत शिवरायांचा नामाचा गगनभेदी जयघोष करत निघालेल्या  आणि विविधतेने सजलेल्या शोभायात्रेचा समारोप शिवछत्रपती वंदना,माॅंसाहेब जिजाऊ वंदना व आरतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला.
दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील मुस्लीम बांधवांनी १० क्विंटल खिचडीचा महाप्रसाद वाटप केला.तर सराफा असोशिएशन मित्र मंडळाने खिचडीचा महाप्रसाद वाटप केला व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांच्या पुढाकारातून बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शर्बतीचे वाटप केले. यावर्षी संपन्न झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात केवळ मराठा समाज बांधवच नव्हे तर सर्व जाती,पंथ,धर्मीय शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व खऱ्या अर्थाने रयतेने रयतेच्या राजांची जयंती साजरी केली.कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या सुनियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली महिला सहा.पो.नि.कल्पना राठोड ,पो.उप.नि.दिगांबर पाटील, पो.उप.नि.केशव राठोड, डी.एस.बी.पो.ना.परमेश्वर गाडेकर यांसह आदी पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दल कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तसेच महा.विद्युत वितरण कर्मचारी,नगर परिषद कर्मचारी, व्यापारी,पत्रकार बांधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, आदींनी सहकार्य केले.तर हा शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती चे अध्यक्ष,संदिप पाटील गौड,सचिव आनंद डांगे,स्वागताध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,ॲड.शेखर कुंटे,उमेश पाटील कापसे,गजू पाटील कल्लूरकर,सय्यद जुनेद,तौसिफ इनामदार,निळकंठ वर्षेवार,राजेश्वर कदम देशमुख,दिपक वर्षेवार,मोहन राठोड, अंकुश रतनवार,गोविंद मेटकर यांसह सर्व पदाधिकारी बांधव व शिवप्रेमींनी अथक परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !