Sat. Dec 21st, 2024
Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय संविधान दिन व मुंबई येथे २६/११ रोजी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले वीर पोलीस जवानांना विनम्र आदरांजली वाहण्याच्या औचित्याने भोकर पोलीसांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला असून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन आदरांजली वाहिली आहे.
भारतीय संविधान दिन व मुंबई येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर शहिदांना एक आगळी वेगळी आदरांजली वाहण्यासाठी भोकर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांच्या प्रमुख उपस्थितीत व पो.नि.अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबीराच्या प्रारंभी संविधान निर्माते वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर व २६/११ च्या भ्याड हल्ल्यात  शहीद झालेल्या सर्व जवानांना पुष्पांजली अर्पण करून सलामी देऊन विनम्र आदरांजली वाहिली आणि संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.त्यानंतर भोकरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत अमना,पो.नि.अजित कुंभार यांनी रक्तदान करुन शिबिराचे उद्घाटन केले‌.या शिबिरात भोकर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी,कर्मचारी व पोलीस मित्र  अशा एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यात प्रामुख्याने महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेन्द्र औटे,पो.उप. नि.सुरेश जाधव,पो.उप.नि.राम कराड,सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव,जमादार बालाजी लक्षटवार,जमादार सोनाजी कानगुले,जमादार वंदना घुले, जमादार रवि मुधोळे,पो.कॉ.परमेश्वर गाडेकर,पो.कॉ.परमेश्वर कळणे,पो.कॉ.प्रमोद जोंधळे,पो.कॉ.जी.एन.आरेवार,पो.कॉ. चंद्रकांत आरकिलवार,होमगार्ड मिर्झा फईम बेग,पोलीस मित्र श्रीकांत दरबस्तवार,जुनेद पटेल यांसह आदी महिला,पुरुषांचा समावेश आहे.संपन्न झालेल्या रक्तदान शिबीर प्रसंगी जीवन आधार रक्तपेढी नांदेडचे पि.आर.ओ नारायण मस्के,टेक्निशियन सुपरवायझर बालाजी आमिलकंठवार,असिस्टंट टेक्निशियन गोपाल मुंगल, अनिल चाळणेवाड यांनी रक्तदात्यांच्या रक्त पिशव्या संकलीत केल्या.तर हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी भोकर पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचारी,पोलीस पाटील,होमगार्ड आणि पोलीस मित्र यांसह आदिंनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !