Mon. Mar 31st, 2025

अंध सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींना आमदार निधीतून देणार लॅपटॉप-आमदार हेमंत भाऊ पाटील 

Spread the love

•दिव्यांग महिला कला क्रिडा महोत्सवाचे आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : बियाँड़ व्हिजन फाउंडेशन संस्था व समदृष्टी प्रतिष्ठान मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडिअम नांदेड येथे दि.८ मार्च रोजी दिव्यांग महिला कला क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या.दिव्यांग व्यक्तीचे स्वाभिमानाने जीवन जगण्याचे त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर परिसरातील द्वाटरी दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे (लॅपटॉप) उपलब्ध करून देण्यासाठी २० लाख रूपये आर्थिक सहाय्य देणार असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी घोषीत केले.

जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधुन क्रीडा संकुल परिसर नांदेड येथे या महोत्सवाचे उद्घाटन आमदार हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून १५० पेक्षा अधिक दृष्टीहीन दिव्यांग महिला सहभागी झाल्या होत्या. महोत्सवाचे स्वरूप अंध मुलींचे प्रदर्शनीय क्रिकेट सामने, राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा,गुणवंत महिलांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन,भेटवस्तुचे वितरण असे होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,जिल्हा समाज कल्याणचे सतेंद्र आऊलवार,पदाधिकारी सचिन किसने,संजय शिंदे,महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मशाळा सलग्न वसतिगृह अधीक्षक,गृहपाल महासंघ संदिप चोपडे, महासचिव बियाँड व्हिजन फाऊंडेशनच्या सौ.मीरा चोपडे,प्रकल्प प्रमुख तथा कोषाध्यक्षा वी.व्ही.गणेश साकळे,समदृष्टी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश साकले,समदृष्टी प्रतिष्ठानचे सचिव देवेन सोनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊ‌लवार यांनीही आयोजनाचे कौतुक केले व शासन आपल्या सोबत आहे असे सांगून महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.माधव गोरे यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे आभार स्वागताध्यक्ष सचिन किसवे यांनी मानले व सुरेख असे सुत्रसंचलन देवेन सोनार यांनी केले. 

याप्रसंगी सौ.मिरा चोपडे,शहनाज शेख,नयना पाटणकर या दिव्यांग महिलांचा व गणेश साकळे यांचा राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारत या संस्थेत राष्ट्रीय युवा सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमानंतर श्री गोविंदसिंघजी क्रीडांगणावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सचिन किसवे यांच्या हस्ते मुलीच्या क्रिकेट सामन्याचे नाणेफेक करून उदघाटन करण्यात आले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !