मुदखेड येथे शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी भाजपाचे संमेलन संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुदखेड : शासकीय विश्रामगृह मुदखेड जि.नांदेड येथे दि.११ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी ता.मुदखेड च्या कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदरील बैठकीत शासकीय योजनेच्या लाभार्थ्यां विषयी चर्चा करण्यात येऊन सर्वसामान्यांना अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे संमेलन घेण्यात आले.
संपन्न झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बालाजी खटिंग हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधान परिषदचे माजी प्रतोद तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी अकरा योजनांची माहिती कार्यकर्त्यांसमोर मांडली.त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण,मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अशा आदी योजनांचा समावेश होता.तसेच सदरील योजनांचे फार्म एकाच छता खाली,एकाच वेळी भरून घेण्यासाठी व त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी बारड येथील लक्ष्मी मंगल कार्यालय आणि निवघा येथील मंगल कार्यालय येथे,दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी मुगट व माळकौठा येथे आणि दि.१४ ऑगस्ट २०२४ रोजी मुदखेड शहरात सकाळी १०:०० वाजता पासून लाभार्थींचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत,अशी माहिती देण्यात आली आहे.तसेच ही माहिती भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
यासाठीच या लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.याचा लाभ तळागळातील शेवटच्या व्यक्तीला मिळावा व या संमेलनात सहभागी करून घेऊन एकही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी भाजपा पदाधिकाऱ्यांनी घ्यावी असे ही यावेळी ठरविण्यात आले आहे.ही जबाबदारी बुथ अध्यक्ष,शक्तिकेंद्र प्रमुख,पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे व जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून द्यावा,असे आवाहन या संमेलनातून करण्यात आले आहे.
या नंतर जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांनी ‘एक पेड मां के नाम’ हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला उपक्रम सर्वांनी सर्वत्र राबवावा आणि ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात ही सहभागी व्हावे,तसेच बुथ स्थरा पासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन प्रत्येक बुथ वर नव मतदारांची नोंदणी करुन घ्यावी,असे आवाहन केले आहे.या संमेलनात माजी आमदार अमरनाथ राजूरकर,प्रवीण गायकवाड,बालाजी खटिंग,संजय सोनटक्के,उद्धव पवार,डॉ.माणिक जाधव,गोपीनाथ मुंगल, भीमराव कल्याने,सुदाम पाटील खानसोळे,पुरुषोत्तम चांडक, माधव कदम,गोविंद उर्फ कानोबा बिस्मिले,प्रभाकर पांचाळ, संजय आऊलवार,कोमल जैस्वाल,मारुती किरकन,सतीश मुंगल,गजू कमळे,माधव गाढे,बालाजी बुचडे,रामसिंग चव्हाण, प्रल्हाद मस्के,शिवाजी पाटील पवार,विठ्ठल पाटील पवार,संजय पाटील पवार,साईनाथ गिरी यांसह आदी कार्यकर्त्यांची उपस्थित होती.