भोकरच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात उद्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दिगंबरराव बिंदू कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या येथील दिगंबराव बिंदू महाविद्यालयात मुला-मुलींसाठी ‘क’ विभागीय झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
दि.१९ सप्टेंबर रोजी सकळी १०:३० वाजता होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृह, महसूल,सहकार राज्यमंत्री तथा अध्यक्ष कै.दिगंबरराव बिंदू स्मारक समिती,भोकरचे अध्यक्ष डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर हे राहतील.तर तहसिलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,स्वा.रा.ती.म.विद्यापीठातील क्रीडा संचालक डॉ.भास्कर माने,कै.दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे सचिव शेख मुरादमियां मांजरमकर यांची उपस्थिती राहणार आहे.कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.पंजाब चव्हाण,शारिरीक शिक्षण व क्रिडा विभाग प्रमुख डॉ.व्यंकट एस.माने यांनी केले असून या कबड्डी स्पर्धेची माहिती प्रसिद्धी प्रमुख डॉ.जे.टी.जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.