भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रिस्टॅक आयडीची नोंदणी करावी-तहसिलदार विनोद गुंडमवार

तालुक्यातील जवळपास २२ हजार शेतकऱ्यांची अद्यापही नोंदणी शिल्लक ; ही आयडी नोंदणी न केल्यास विविध योजनांपासून वंचित रहावे लागणार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारत सरकारची ॲग्रिस्टॅक संकल्पना महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.सदर संकल्पनेनुसार शेतक-यासांठीचे तीन पायाभूत माहिती संच तयार करावयाचे काम चालू आहे. त्या अनुषंगाने भोकर तालुक्यातील १६ हजार ८६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून अद्यापही जवळपास २२ हजार शेतकऱ्यांची नोंदणी होणे आहे.तरी विविध योजनांपासून उपरोक्त शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी,असे आवाहन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.
भारत सरकारची ॲग्रिस्टॅक संकल्पना महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.ॲग्रिस्टॅक (Agristack) प्रकल्प अमंलबजावणी बाबतचा कालबध्द कार्यक्रम सुरु असून सदर संकल्पनेनुसार शेतक-यासांठीचे तीन पायाभूत माहिती संच तयार करावयाचे काम चालू आहे.त्या अनुषंगाने भोकर तालुक्यातील सीएससी(CSC)केंद्राच्या माध्यमातून शेतकरी माहिती संच नोंदणी सुरू आहे. अनेक योजनांचा लाभ शेतकरी माहिती संच प्रकल्पाव्दारे शेतक-यांना उपलब्ध होणार आहे.जसे की,पिक कर्ज,पी.एम.किसान योजनेचा लाभ,पिक विमा,हमी भाव खरेदी यासह आदी योजनांचा यात समावेश आहे.याकरीता तहसिल कार्यालयात देखील शेतकरी माहिती संच निर्मीती कक्ष स्थापण केला आहे.
दि.२१ मार्च २०२५ पर्यंत तालुक्यातील १६ हजार ८६६ शेतक-यांनी नोदणी केली असून जवळपास अंदाजे २० हजार ते २२ हजार शेतकऱ्यांची नोंदणी होणे अद्यापही शिल्लक आहे.तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी गावातील नोंदणी न केलेल्या शेतक-यांची नावे प्रसिध्द करीत आहेत,तसेच अशा नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जवळील सीएससी (CSC)केंद्रास भेट देवून नोंदणी करून घ्यावी.अन्यथा सरकारी योजनांच्या लाभापासून शेतकरी माहिती संच नसल्यामुळे या शेतकऱ्यांना वंचित राहवे लागेल.तसे होऊ नये म्हणून नोंदणीची सुनिश्चिती करावी,असे आवाहन भोकर चे तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.