Fri. Apr 11th, 2025

भोकर तालुक्यातील शिधापत्रिकाधाकांनी सर्व सदस्यांची ई-केवासी तात्काळ करावी-तहसिलदार विनोद गुंडमवार

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शासनाच्या अनुदानित अन्नधान्याचा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राशनकार्डधारकांनी सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. रेशनकार्ड ई-केवायसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणे बंद होणार आहे.अद्यापही तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण ९१०९५ लाभार्थ्यांपैकी ४३११८ लाभार्थ्यांची ई-केवायसी होणे शील्लक आहे.त्यामुळे या सर्व राशनकार्ड धारकांनी ई केवायसी दि.२८ फेब्रुवारी पर्यंत तात्काळ करुन घ्यावी,असे आवाहन वाहन तहसिलदार तथा तालुकादंडाधिकारी विनोद गुंडमवार व नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी श्रीकांत आडेपवार यांनी केले आहे.
राज्यातील नागरीकांना उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुदानित अन्नधान्य देण्यात येत असते.या योजनेमध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील राशन कार्डधारक कुटूंबाचा समावेश आहे.या अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील शिधापत्रिकेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व सदस्यांची ई-केवासी करणे बंधनकारक आहे.केवायसी न केल्यास अन्नधान्य योजनेचा लाभ त्या सदस्याला मिळणार नाही.त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारक सदस्यांनी दि.२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे मुळ राशनकार्ड व आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतिसह रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या ई-पॉस मशिनवर सर्व सदस्यांनी बोटाचे ठसे देवून आपली ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी.
भोकर तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील एकूण ९१०९५ लाभार्थी असून आज रोजी पर्यंत ४७९७७ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे.तर अद्यापही ४३११८ लाभार्थ्यांची ई-केवायसी होणे शिल्लक आहे.केवायसी न केलेल्या राशनकार्ड धारकांना अन्नधान्य मिळणे बंद होणार आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्डधारकांनी आपली ई केवायसी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत करुन घ्यावी व होणारी गैरसोय टाळावी,असे आवाहन तहसिलदार विनोद गुंडमवार आणि नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी श्रीकांत आडेपवार यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !