शेती उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी भोकर तालुका युवक काँग्रेसने काढला मोर्चा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : शेती उत्पादनावर खर्च अधिक होतोय तर उत्पादनास भाव कमी मिळतोय.अहोरात्र राबून शेती उत्पादनावर अवलंबून राहणाऱ्या शेती उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे.यास केंद्र व राज्य सरकारचे शेती धोरण जबाबदार असल्याचा आरोप करुन शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला योग्य भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी भोकर तालुका युवक काँग्रेसने दि.१ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन.
खरीप असो अथवा रब्बी पिकांसाठी लागणारे रासायनिक खते,बी-बियाणे,औषधी यांसह आदींचे भाव प्रतिवर्षी वाढतच आहेत.यामुळे शेती उत्पादनावर होणारा खर्च अधिक होत आहे व उत्पादन ही कमी आणि त्या उत्पादनास भाव ही कमी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड व संकटांना सामोरे जावे लागत आहे.नव्हे तर अनेकजण यामुळे आत्महत्या ही करत आहेत.भोकर तालुक्यातील शेतकरी देखील अशाच संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा होणारा खर्च पाहता सोयाबीनला प्रतिक्विंटल ७ हजार रुपये,कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपये व हरभऱ्यास प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव मिळायला पाहिजे.परंतू या प्रमाणे भाव मिळत नसून सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ८०० रूपये व कापसाला प्रतिक्विंटल केवळ ६ हजार रुपये भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या पणन महामंडळाने कापसाला हमी भाव देऊन कापूस खरेदी करावयास पाहिजे होता.परंतू अद्यापही खरेदी केंद्र सुरु केले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यास केंद्र व राज्य सरकारचे शेती धोरण जबाबदार आहे.असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनास योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे. यामागणीसाठी भोकर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी महात्मा बसवेश्वर चौक ते भोकर तहसिल कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला.तसेच ही मागणी सरकारने तात्काळ मंजूर केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सदरील निवेदन तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
सदरील मोर्चाचे नेतृत्व स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे सभापती जगदीश पाटील भोसीकर व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्रिक पाटील मुंगल बेंबरकर यांनी केले असून या मोर्चात,बाजार समितीचे उपसभापती बालाजी श्यानमवाड, संचालक रामचंद्र मुसळे,केशव पाटील पोमनाळकर,संचालक राजू अंगरवाड,व्यंकट पाटील,सुरेश पाटील डूरे,कैलास पाटील,राघोबा पाटील,सतिश पाटील,विक्रम क्षिरसागर,नागोराव दंडे,श्रीधर जाधव,परसराम पाटील,प्रताप पाटील,शिवाजी पाटील,माधवराव पाटील सुर्यवंशी,आनंद ढोले, गणेश यादव,गिरीष पाटील,श्रीकांत दरबस्तवार,धनराज मोघाळीकर,श्याम पाटील,विठ्ठल धोंडगे,साई येलूरे,बालाजी येलपे,सुनिल जाधव,गोविंद मेटकर यांसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.