भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिली दावत-ए-ईफ्तार मध्ये अग्रेसर

हिंदू-मुस्लीम एकता व बंधूतेची जपली परंपरा…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे,या महिन्यात जगभरातील मुस्लिम उपवास(रोजा) धरतात.या पवित्र महिन्यात उपवास धरणारे लोक सायंकाळी सुर्यास्ताबरोबर फळ व आदी अन्न ग्रहण करून उपवास सोडतात.याच अनुषंगाने हिंदू- मुस्लिम एकता व बंधूतेचा संदेश देण्यासाठी दावत-ए-इफ्तार चे आयोजन हिंदू बांधवांकडून केल्या जाते.हल्ली भोकर शहरात दावत -ए-इफ्तार दुर्मिळ झाले आहे.परंतू भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या पुढाकारातून दि.२६ मार्च २०२५ रोजी दावत-ए-इफ्तार चे आयोजन करण्यात आले व अन्य पक्षांना मागे टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यात अग्रेसर राहिली आहे.
हिंदू मुस्लिम एकता व बंधूतेचा संदेश देण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय पक्ष व संघटनांत चढाओढ असायची.परंतू काही वर्षांत से चित्र बदलल्याचे दिसते. विशेषत: काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्यात दावत-ए-इफ्तार चे आयोजन अधिक प्रमाणात केल्या जायचे.परंतू या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. तर याच अनुषंगाने भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या पुढाकारातून भोकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर विधानसभा समन्वयक श्यामराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष आनंदभाऊ डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष पंकज भोसीकर, जिल्हा सरचिटणीस सिध्दू पाटील चिंचाळकर, जिल्हा सरचिटणीस रवी गेंटेवार,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,तालुका सचिव महेंद्र कांबळे,शिवाजी पाटील लागळूदकर,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुनीताताई बसीनलोड,यशोदाबाई शेळके,चंद्रकलाबाई गायकवाड,महिला आघाडी शहराध्यक्षा रुपाली शिकैन्टवाड, कल्पनाताई कदम,महेंद्र दुधारे,विलास गुंडेराव,स्वप्नील मोरे,व्यंकट वर्षेवार,गजु पाटील सोळंके,परशु पाटील डौरकर,आनंद पाटील ढवळे,श्रीकांत पाटील किन्हाळकर,साहेबराव वाहूळकर,दशरथ इंदरवाड,अविनाश आलेवार,असंख्य मुस्लिम बांधव व धर्मगुरू यांसह आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपवासार्थी व उपस्थित प्रमुख पाहुण्यांसाठी खजुर,फळे, पाणी,शितपेय व रुचकर अशा खाद्य पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.तर सदरिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोकर शहराध्यक्ष फईम पटेल,युवकचे भोकर शहराध्यक्ष मोहम्मद माझहरोद्दीन,अल्पसंख्याक विभाग नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष एजास कुरेशी,असंघटित कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष समी इनामदार,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शादुल्ला शेख,ॲड. शमशोद्दीन अल्तमश,ॲड.शेख सलीम,सय्यद जफर,इब्राहिम शेख यांसह आदिंनी परिश्रम घेतले.