Thu. Dec 19th, 2024

भोकर च्या तहसिलदार पदी विनोद गुंडमवार यांची नियुक्ती ; सुरेश घोळवे यांची शिरुर कासार येथे बदली

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना शासन आदेश क्र.बदली-२०२४/प्र.क्र.१३१-अ/ई-३,दि.३ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आले असून या आदेशानुसार नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या श्रीमती सुरेखा नांदे यांची हदगाव येथे तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर हदगाव तहसिल कार्यालयात सेवारत असलेले तहसिलदार विनोद गुंडमवार यांची भोकर तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली असून भोकर येथे सेवारत असलेले तहसिलदार सुरेश घोळवे यांची शिरुर कासार जि.बीड येथे तहसिलदार पदी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने पत्रान्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ च्या कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदींनुसार सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना व बदल्या करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव अजित देशमुख यांच्या स्वाक्षरीने दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तहसिलदार श्रीमती सुरेखा नांदे यांची हदगांव,जि.नांदेड येथे तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर हदगाव तहसिल कार्यालयात सेवारत असलेले तहसिलदार विनोद गुंडमवार यांची तहसिलदार कार्यालय भोकर येथे तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भोकर तहसिल कार्यालयात सेवारत असलेले तहसिलदार सुरेश घोळवे यांची शिरूर कासार जि.बीड येथे तहसिलदार पदी बदली करण्यात आली आहे.याच बरोबर मोहाडी जि.भंडारा येथील तहसिलदार सुरेश वाघचौरे यांची पारशिवनी जि.नागपूर येथे तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली असून दि.३ ऑगस्ट २०२४ चे आदेश रद्द करण्यात येऊन पदस्थापनेने तहसिलदार धनंजय यांची तहसिल कार्यालय लाखनी,जि.भंडारा येथील तहसिलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच लाखनी जि.भंडारा येथून तहसिलदार दत्तात्रय निंबाळकर यांची मौदा जि.नागपूर येथील तहसिलदार धनंजय देशमुख यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी भोकर तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून उत्तम सेवा बजावली होती. पदोन्नतीनंतर ते आता पुनश्च एकदा तहसिलदार म्हणून कर्तव्य सेवा बजावण्यासाठी भोकर येथे येत आहेत.तर तहसिलदार राजेश लांडगे यांच्या भोकर येथील बदलीनंतर त्यांच्या रिक्त जागेवर तहसिलदार सुरेश घोळवे हे आले होते व आता त्यांची बदली झाली आहे.भोकर चे तहसिलदार म्हणून त्यांनी अल्प काळ कर्तव्य सेवा बजावली असली ती सेवा स्मरणात राहणार आहे.त्यांनी पाणंद रस्ते मुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यशस्वी प्रयत्न आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !