ह.भ.प.भक्ती दीदी पांचाळ यांच्या रसाळ वाणीतून सादर होणार श्रीमद्भागवत कथा
भोकर मध्ये १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान श्रीमदभागवत कथा व विश्वकर्मा जयंती सोहळ्याचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील श्री विराट विश्वकर्मा प्रभू मंदिराच्या कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त दि.१५ ते २२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान श्रीमद भागवत कथा व विश्वकर्मा जयंती सोहळा साजरा होणार असून श्रीमद्भागवत कथा प्रख्यात ह.भ. प.भक्ती दीदी पांचाळ आळंदी यांच्या रसाळ वाणीतून ऐकावयास मिळणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भोकर येथील म्हैसा रोडवर विराट विश्वकर्मा प्रभू यांचे भव्य मंदिर उभारले असून तेथे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.मंदिर कलशारोहणच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दि.१५ ते २२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान श्रीमद्भागवत कथाकार ह.भ.प.भक्ती दीदी पांचाळ यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथा ऐकावयास मिळणार आहे.दररोज रात्री ८:०० ते १०:०० या वेळेत किर्तनाचे कार्यक्रम होतील.तर दि.१५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज कल्याने हदगाव,दि.१६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.देविदास महाराज गीते माळाकोळी,दि .१७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.महाजन महाराज दगडवाडीकर, दि.१८ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.बाबुराव महाराज तेरकर उमरखेड,दि.१९ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज नांदेड,दि.२० फेब्रुवारी रोजी ह.भ.प.गंगाधर महाराज एकलारकर,दि.२१ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.राजेश्वर महाराज बोमनाळीकर यांचे कीर्तन होणार आहे.तसेच दि .२२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० दरम्यान ह.भ.प.भक्ती दीदी पांचाळ आळंदी यांचे काल्याचे किर्तन व दुपारी १२:०० वाजता विराट प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. किर्तन व भजनात काकीलवाड गुरुजी यांचे भजनी मंडळ सहभागी राहील व मृदंगाचार्य गणेश महाराज काकीलवाड, कृष्णा पांचाळ माळाकोळी हे मृदंग संगीत साथ देणार आहेत. तरी भाविक भक्तांनी या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विश्वकर्मा समाज बांधव व आयोजन समिती भोकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.