बेंबर येथील जेष्ठ नागरिक संभाजी दंडे यांचे दु:खद निधन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.बेंबर येथील शेतकरी तथा प्रतिष्ठीत जेष्ठ नागरिक संभाजी भिमाजी दंडे(८०) यांचे दि.१८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी वृधापकाळी दु:खद निधन झाले आहे.ते बेंबर चे माजी सरपंच नागोराव दंडे यांचे जेष्ठ बंधू होत.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,सूना,जावई,नातू व पंतू असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थीवावर दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता बेंबर गावाबाहेरील भोकर रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.दंडे परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी असून स्व.संभाजी दंडे यांना संपादक उत्तम बाबळे व परिवाराची भावपुर्ण श्रद्धांजली!