संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी समिती सदस्यपदी प्रविण चव्हाण यांची नियुक्ती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णयान्वये संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजना अंमलबजावणीबाबत बंजारा/लमाण तांडा वस्ती घोषित करणे,गावठाण जाहिर करणे,तांडयाला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरीय समित्या नुकत्याच गठीत करण्यात आल्या असून भोकर तालुका समितीच्या अशासकीय सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते प्रविण भाऊ चव्हाण चिदगिरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
ग्राम विकास विभाग,शासन निर्णय क्र.तांडा सुधार- २०१९/प्र.क्र.६७/आस्था-५,दि.२३.०२.२०२४ अन्वये संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजना अंमलबजावणीबाबत बंजारा/लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे,तांडयाला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे,ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इ.व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून,सदरहू योजनेतर्गत करावयाच्या कामाचा ग्राम पंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्राधान्यक्रम व निकड लक्षात घेऊन कामाची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये बंजारा/लमाण समाजाचे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.ही बाब विचारात घेऊन तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीमध्ये बंजारा/लमाण/लभाण समाजाच्या अशासकीय सदस्यांची ३ वर्षाकरिता नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.याच अनुषंगाने तालुका स्तरीय समिती मध्ये समाजाच्या अशासकीय सदस्यांची ३ वर्षाकरिता निवड करण्यात आली असून भोकर तालुकास्तरीय समितीमध्ये बंजारा समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण भाऊ चव्हाण चिदगिरीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्तीचे पत्र भोकरचे तहसिलदार तथा समिती अध्यक्ष यांनी प्रविण भाऊ चव्हाण यांना दिले आहे. प्रविण भाऊ चव्हाण यांनी मागील काही वर्षापासून भोकर तालुक्यातील विविध ताड्याच्या मूलभूत सुविधांसाठी लढा दिला आहे.मुख्य रस्ते पाणी पुरवठा,वीज पुरवठा,शासनाच्या विविध योजना,गट ग्रामपंचायत अंतर्गत गावात राबविण्यात येतात.परंतू ताड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जाते यासाठी प्रविण भाऊ चव्हाण यांनी जनहितार्थ संघर्ष केला आहे.तसेच तांडा जोडो अभियानात त्यांनी तालुक्याचे नेतृत्व त्यांनी केले आहे.तांडावस्तीच्या विकासासाठी कायम धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संत सेवालाल महाराज बंजारा/लमान तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय समितीवर काम करण्याची संधी मिळाली असल्याने तांडा वस्तीच्या विकासाला चालना मिळणार आहे.त्यामुळे तालुक्यातील वरिष्ठ,कनिष्ठ समाज बांधव व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.