साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या उपाध्यक्षपदी सचिन साठे यांची नियुक्ती
तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री दिलीप कांबळे यांची नियुक्ती
उपरोक्तांसह महायुती सरकारने राज्यातील २७ महामंडळांवर केल्या अनेकांच्या नियुक्त्या
अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले असून राज्यातील २७ महामंडळांवर अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करुन अनेकांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या उपाध्यक्षपदी(राज्यमंत्री दर्जा) साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची नियुक्ती केली असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी(राज्यमंत्री दर्जा) माजी मंत्री दिलीप कांबळे यांची नियुक्ती केल्याचा समावेश आहे.
महायुती सरकारने होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी अनेक निर्णय घेतले.त्यात राज्यातील जनतेच्या हितासह तिन्ही पक्षांतील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन ही केल्याचा समावेश आहे.साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ते व विचार अनुयायींची सर्व पक्षांकडे मागणी होती.डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे व नातजावई गणेश भगत यांनी मानवहित लोकशाही पक्ष व अण्णा भाऊ साठे क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील समाजाचे एकीकरण करत त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले.तसेच अन्याय अत्याचाराचा विरोध करुन समाजास न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्यासोबतच चिराग नगर,घाटकोपर मुंबई येथील विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कर्मभूमितले आंतरराष्ट्रीय स्मारक सचिन भाऊ साठे यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली उभारण्याच्या हेतूने त्यांची साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारक समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि अनपेक्षीतपणे त्यांची नियुक्ती केली.याच बरोबर गेल्या पाच वर्षांपासून राजकीय पदापासून दूर ठेवण्यात आलेल्या व होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार म्हणून पुणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले माजी मंत्री दिलीप कांबळे यांची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती केली.एकूणच असे की,यातून महामंडळ आणि समितिच्या माध्यमातून उपरोक्त दोघांसह अन्य २५ जणांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.उर्वरित नियुक्त्या पुढील प्रमाणे आहेत…
•महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदी शहाजी पवार, •महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षपदी सतीश डोगा तर उपाध्यक्षपदी मुकेश सारवान,•वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निलय नाईक,•महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अरविंद पोरट्टीवार,•महाराष्ट्र राज्य सहकार कृषी व पणन मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत परिचारक,
•मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी,•महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रमोद कोरडे,•महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदी वासुदेव नाना काळे, •पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय वडकुते,उपाध्यक्षपदी बाळासाहेब किसवे,संतोष महात्मे,• महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या अध्यक्षपदी अतुल काळसेकर, •महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी राजेश पांडे,• महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या अध्यक्षपदी गोविंद केंद्रे,• महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन(मित्रा)च्या सदस्यपदी बळीराम शिरसकर,•राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळाच्या उपाध्यक्षपदी दौलत नाना शितोळे,• महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अतुल देशकर,•महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र सावंत,•महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी (माविम) मिनाक्षी शिंदे व उपाध्यक्षपदी राणी द्विवेदी,•आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी काशिनाथ मेंगाळ,•कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विजय चौगुले, •आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अजय बोरस्ते,• महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भाऊसाहेब चौधरी,•महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कल्याण आखाडे,•राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले,• महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी संदीप लेले व उपाध्यक्षपदी अरुण जगताप यांची नियुक्ती केली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे नवनियुक्त उपाध्यक्ष सचिन भाऊ साठे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष दिलीप कांबळे यांसह सर्व नवनियुक्तांचे संपादक उत्तम बाबळे आणि अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य च्या वतीने अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन तसेच पुढील सेवाकार्यासाठी खुप खुप शुभेच्छा!