डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी गंगाधर करंदीकर यांची नियुक्ती

तर तालुका कार्याध्यक्षपदी अरुण डोईफोडे व भोकर शहराध्यक्षपदी अंबादास बोयावार यांची नियुक्ती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथे डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेची (एबीएस) एक महत्वपूर्ण बैठक दि.२० ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली व या बैठकीत संघटना वाढीच्या संदर्भाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात भोकर तालुकाध्यक्षपदी गंगाधर करंदीकर,तालुका कार्याध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार अरुण डोईफोडे व भोकर शहराध्यक्षपदी पत्रकार अंबादास बोयावार यांसह आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या डॉ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या उत्तर नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी हनुमान नगर,भोकर येथे एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.पि.एन.धसाडे हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे व प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा सचिव किशोर कवडीकर,सामाजिक कार्यकर्ते केरबाजी देवकांबळे, जिल्हाध्यक्ष सखाराम वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर,जिल्हा सचिव चंद्रकांत बाबळे,जिल्हा कोषाध्यक्षा छायाताई मोरे,जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष आकाश सोनटक्के,चिदगीरीचे माजी सरपंच पवार,संतोष झुंजारे यांसह आदींची उपस्थिती होती.
यावेळी संघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या बाबींच्या अनुषंगाने उपरोक्त मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तसेच भोकर तालुका व शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांत तालुकाध्यक्षपदी गंगाधर करंदीकर, तालुका कार्याध्यक्षपदी पत्रकार अरुण डोईफोडे, तालुका उपाध्यक्षपदी अविनाश कराळे,तालुका सचिवपदी डाकोरे, तालुका कोषाध्यक्षपदी राम बोईवार,युवा उपाध्यक्षपदी मारोती कराळे,भोकर शहराध्यक्षपदी पत्रकार अंबादास बोयावार, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष पदी प्रल्हाद सुंकळेकर यांसह आदींचा समावेश आहे.तर या बैठकीस बहुसंख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती.या उपस्थितांसह मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.