Sun. Dec 22nd, 2024

भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नायब तहसिलदार मारोती जगताप यांची नियुक्ती

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेल्या परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांच्याकडे होता. शासनाने त्यांना नुकतेच एकतर्फी कार्यमुक्त केल्याने सदरील पदभार रिक्त झाला होता.याच अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुदखेड तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार महसूल -१ या पदावर सेवारत असलेल्या मारोती जगताप यांची भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती केली आहे.

मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांची बदली झाल्यापासून भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारी पदभार कधी भोकर तर कधी मुदखेड तहसिलदार यांच्याकडे होता.भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे यांची बदली झाली व त्यांच्याकडील मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भोकर चे परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.त्या हा पदभार स्विकारल्या नंतरच्या कार्यकाळा दरम्यान अगदी मोजके दिवसच भोकर नगर परिषदेत त्यांनी उपस्थिती लावली.यामुळे नगर परिषदेचा कारभार पुर्णतः कोलमडून गेला होता व नागरिकांची कामे खोळंबली होती.याच दरम्यान दि.१४ मार्च २०२४ रोजी एका आदेशपत्रान्वये अनुपसिंह यादव यांना शासनाने मुख्याधिकारी पदावरुन एकतर्फी कार्यमुक्त केल्याचे कळविले असल्याने भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार रिक्त झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार अन्य अधिकारी यांच्याकडे सोपविणे आवश्यक होते.म्हणून नगर परिषद प्रशासन व नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय क्षेत्रांतर्गतच्या मुदखेड तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार महसूल-१ या पदावर सेवारत असलेल्या मारोती जगताप यांची दि.१४ मार्च २०२४ रोजी भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला.तसेच त्यासंबंधीचे आदेशपत्र ही त्यांना देण्यात आले आहे.

होऊ घातलेल्या १८-व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.त्यामुळे ही निवडणूक पार पडेपर्यंत तरी भोकर नगर परिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे नियमानुसार अशक्य आहे.असे असले तरी नायब तहसिलदार मारोती जगताप हे एक अनुभवी अधिकारी असून यापुर्वी त्यांनी प्रभारी तहसिदार, प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार उत्तमरित्या सांभाळलेला आहे.आदर्श आचारसंहिता दरम्यानच्या काळात नगर परिषद कार्यालय क्षेत्रांतर्गत निवडणूक प्रचार सभा,कॉर्नर बैठका,प्रचार व प्रसिद्धी फलके आणि पक्ष ध्वज लावण्या संबंधीच्या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे असते.यास्तव मुख्याधिकारी असणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळेच नगर परिषद व जिल्हा प्रशासनाने उत्तम पुर्वानुभव असलेल्या नायब तहसिलदार मारोती जगताप यांच्यावर भोकर नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला असून लोकसभेच्या निवडणूक संबंधीतची कामे व नागरिकांची खोळंबलेली कामे पुढील आदेश येईपर्यंत ते यशस्वीपणे करतील अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !