Sun. Dec 22nd, 2024
Spread the love

तहसिलदार राजेश लांडगे यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणा-या पदाचा ते घेणार पदभार

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने तहसिलदार संवर्गातील छत्रपती संभाजीनगर विभागातील २७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तहसिल कार्यालय भोकर चा पदभार असलेल्या तहसिलदार राजेश लांडगे यांच्या प्रतिकृतीने रिक्त होणाऱ्या जागी महसूल विभाग जि.का.परभणी येथील तहसिदार सुरेश घोळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने पत्रान्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ च्या कलम ४(४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकारी शासनाचे उप सचिव अजित देशमुख यांच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील २७ तहसिलदार पदस्थ अधिकाऱ्यांची दि.३१ जानेवारी २०२४ रोजीच्या आदेशपत्रान्वये पदस्थापना करण्यात येत आहे.यात तहसिलदार सुरेश घोळवे यांचा समावेश असून तहसिल कार्यालय भोकर जि.नांदेड चे तहसिलदार राजेश लांडगे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणा-या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये भोकर तहसिल कार्यालयाचा पदभार स्वीकारलेल्या तहसिलदार राजेश लांडगे यांचा सव्वा दोन वर्षाचा येथील प्रशासकीय कार्यकाळ होत असल्याने ते बदलीस पात्र आहेत.दरम्यानच्या काळात त्यांनी तहसिलदार पदासह भोकर उपविभागीय अधिकारी,भोकर नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी असे विविध पदभार उत्तम प्रकारे सांभाळली आहेत.या कार्यकाळात त्यांनी अनेक उल्लेखनीय प्रशासकीय व विकासात्मक कामे केली आहेत.हे येथील नागरिकांच्या सदैव स्मरणात राहणार आहे.तहसिलदार राजेश लांडगे यांना अद्याप कुठेही नियुक्ती देण्यात आली नसून छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती लवकरच होणार असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.तसेच नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिका-यांनी पुढील आदेशापर्यंत शासन परिपत्रक,महसूल व वन विभाग,दि.०१.१२.२०२३ मधील सूचनेनुसार संबंधित विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी यांच्याकडे रुजू व्हावे असे आदेशित करण्यात आले आहे.तर त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर तहसिलदार सुरेश घोळवे यांची नियुक्ती करण्यात आली असून तहसिल सुरेश घोळवे यांनी यापूर्वी तहसिल कार्यालय देवणी येथे व जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी येथे उत्कृष्ट सेवाकर्तुत्व बजावले आहे.त्यांनी देखील तहसिलदार राजेश लांडगे यांच्या सारखेच येथेही सेवाकर्तव्य सजवावे अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग अंतर्गत च्या तहसिलदार संवर्गातील २७ अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांचे आदेशपत्र व पदनियुक्त अधिकाऱ्यांची नावे आणि पद स्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे…


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !