भोकर उपविभागीय अधिकारी पदी प्रविण मेंगशेट्टी यांची नियुक्ती
उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणा-या पदाचा ते पदभार घेणार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर चा पदभार असलेल्या उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांच्या प्रतिकृतीने रिक्त होणाऱ्या जागी उप जिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन पत्रान्वये विहित केलेल्या तरतुदी व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,२००५ च्या कलम ४१४) आणि ४(५) मधील तरतुदींनुसार उप जिल्हाधिकारी संवर्गातील १४ अधिका-यांना प्रशासकीय कारणास्तव शासनाचे उप सचिव संतोष वि.गावडे या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने व मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने दि.३१ जानेवारी २०२४ रोजी पदस्थापना देण्यात आली आहे.
आक्टोंबर २०२३ मध्ये पदोन्नत तहसिलदार सचिन यादव यांची भोकर चे उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या रुपाने कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयास मिळाल्याचा आनंद येथील नागरिकांना झाला.परंतू त्यांचे भोकर येथे मन रमत नसल्याने राज्यकर्ते व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बदलीसाठी त्यांनी फिल्डींग लावली होती आणि येथील पदभार तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे सोपवून थेट मुंबई मंत्रालय गाठले होते.त्यांचा पदाचा रिक्त पदभार तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे देण्यात आला होता व काही दिवसांपूर्वी तो पदभार अनुपसिंह यादव यांच्याकडे देण्यात आला आहे.सद्या भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव हे सेवारत आहेत.अखेर उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांना आपली बदली करुन घेण्यात यश आले असले तरी त्यांना अद्याप कुठेही नियुक्ती देण्यात आली नसून राज्यातील अधिका-यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या एका पदावर त्यांची नियुक्ती लवकरच होणार असून त्यांचे नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.तसेच शासन परिपत्रक,महसूल व वन विभाग,दि०१.१२.२०२३ अन्वये नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिका-यांसोबत पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत त्यांनी संबंधित विभागीय आयुक्तांकडे रुजू व्हावे असे आदेशित करण्यात आले आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात उदगीरचे उपविभागीय अधिकारी म्हणून प्रविण मेंगशेट्टी यांनी उत्तम कर्तव्य सेवा बजावली असून सद्या ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,पुणे येथे उप जिल्हाधिकारी म्हणून सेवारत होते.येथून उप विभागीय अधिकारी,भोकर,जि.नांदेड येथील उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांच्या प्रतिनियुक्तीने रिक्त होणा-या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.लवकरच ते हा पदभार स्विकारतील व उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर ला एक कायमस्वरूपी व अनुभवी उपविभागीय अधिकारी मिळणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना झालेल्या अधिकाऱ्यांचे आदेशपत्र व पदनियुक्त अधिकाऱ्यांची नावे आणि पद स्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे…