Thu. Apr 10th, 2025

अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी ५ मार्चला मुंबईतल्या मांगवीर महामोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे-सतीश कावडे

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचे विधेयक महाराष्ट्र सरकारने तातडीने मंजूर करावे,यासह आदी मागण्यांसाठी दि.५ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान,मुंबई येथे ‘मांगवीर महामोर्चाचे’ आयोजन करण्यात आले आहे.तरी सकल मातंग व सत्सम वंचित जात समुहाच्या समाज बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी दिला आहे. त्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मागास अशा मातंग व तत्सम वंचित जात समुहाच्या मागणीनुसार अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची पद्धत निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.या समितीचा अहवाल तात्काळ घ्यावा व महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या सर्व अभ्यास समित्यांनी शासनाकडे दिलेल्या अहवाला आधारे अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण महाराष्ट्र राज्यात मंजूर करावे.हरियाणा,पंजाब, कर्नाटक,तेलंगणा,आंध्रप्रदेश यांसह आदी राज्यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण विधेयक पारित करुन आरक्षणाचे उपवर्गीकरण मंजूर केले आहे.मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय व त्या निर्देशानुसार महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण विधेयक मंजूर करावे आणि सामाजिक न्यायाची,समतेची प्रक्रिया सुरू करावी.तसेच अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण मंजुरीचा कायदा तातडीने पारित करावा, यासह आदी मागणीसाठी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,दलित महासंघ,लालसेना आणि समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने दि.५ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान,मुंबई येथे ‘मांगवीर महामोर्चाचे’ आयोजन केले आहे.समाजातील बुद्धीवादी,सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या समाजसेवी बांधवांनी संजय ताकतोडे यांचे बलिदान विचारात घेऊन सदरील ‘मांगवीर महामोर्चात’ बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने सतीश कावडे यांसह रामराव सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे,इंजि.भाऊसाहेब घोडे, प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,किशनदादा गायकवाड,शिवाजीराव नुरूंदे,एन.डी. रोडे,आकाश सोनटक्के,मालोजी वाघमारे,प्रा.सचिन दाढेल, नागेशभाऊ तादलापूरकर,सुभाष अल्लापूरकर,पत्रकार के.मूर्ती, रामभाऊ देवकांबळे,विश्वांभर बसवंते,प्रा.डॉ.गंगाधर तोगरे,मच्छिंद्र गवाले,संजय गवलवाड,पंडित देवकांबळे, मनोहर वाघमारे,बालाजी गऊळकर,निलेश मोरे,यादवराव वाघमारे,पी.बी.वाघमारे,यू.एम. भिसे,हनुमंत कंधारे,किरण दाढेल,गणेश गायकवाड,आनंद वंजारे व आदींनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !