Sun. Dec 22nd, 2024

उमेदवारांच्या संबधीतांनी विश्वासात घेतले नसल्याने आम्ही अद्यापही प्रचार कक्षे बाहेरच-अमोल पवार

Spread the love

८५-भोकर विधानसभा मतदार संघ महायुतीचे समन्वयक व शिवसेना(शिंदे गट) पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने उद्या दि.४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून ८५-भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या संबंधीतांनी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) गटाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने आम्ही अद्यापही निवडणूक रणांगणाच्या प्रचार कक्षेबाहेरच आहोत,असे भोकर विधानसभा मतदार संघ महायुती समन्वयक तथा तालुका प्रमुख अमोल धनराज पवार यांनी म्हटले आहे.यावरुन मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांतून नाराजीचा सूर निघत असल्याचे निदर्शनास येत आहे.

८५-भोकर विधानसभा मतदार संघातून भाजपाने महायुतीचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या ॲड.श्रीजया पवार यांना उमेदवारी दिली.त्यांची उमेदवारी निश्चित होती त्यामुळे उमेदवारी घोषित होण्यापूर्वी पासूनच खा.अशोक चव्हाण यांनी व ॲड.श्रीजया चव्हाण यांनी अख्खा मतदार संघ पिंजून काढला आहे.तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पुर्वसंध्येला दि.२७ ऑक्टोबर २०२४ रोजी भोकर मध्ये महायुती विजय संकल्प रॅली काढण्यात आली व जाहीर सभा घेण्यात आली.यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,नांदेड चे पालकमंत्री गिरीश महाजन,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू तथा स्मारक समितीचे उपाध्यक्ष सचिन भाऊ साठे, आमदार राजेश पवार,आ.भिमराव केराम यांसह विशेषतः महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट)आमदार विक्रम काळे व तालुका अध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली.परंतू शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार,जिल्हा व तालुका स्तरीय पदाधिकारी आणि भोकर विधानसभा मतदार संघ महायुती समन्वयक तथा तालुका प्रमुख अमोल धनराज पवार यांची उपस्थिती दिसून आली नाही.
यामुळे भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीत सहभागी असलेल्या पक्षात काही तरी घडलय,बिघडलंय अशी चर्चा होत असल्याने शिवसेना महायुतीचे भोकर विधानसभा मतदार संघ समन्वयक तथा अमोल पवार यांनी आमच्याशी संवाद साधला व म्हटले आहे की,भोकर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या वतीने त्यांचे वडील खा.अशोक चव्हाण,भोकर विधानसभा मतदार संघ भाजपा महायुती समन्वयक माजी आमदार अमरनाथ राजूरकर,भाजपाचे जिल्हा व तालुकाध्यक्ष यांसह आदी संबंधितांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापासून ते अद्यापही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला नाही.तसेच संपर्क व सन्मानपूर्वक समन्वय ही साधला नाही.त्यामुळे मतदार संघातील आम्ही सर्व पदाधिकारी अद्यापही निवडणूक रणांगणातील प्रचार यंत्रणेच्या कक्षेबाहेरच आहोत,असे म्हटले आहे.उद्या नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून १२३ उमेदवारांपैकी त्यातील काही उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेतील.यानतर निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष कितीजण राहतील हे स्पष्ट होणार आहे व खऱ्या अर्थाने प्रचार यंत्रणा कामाला लागणार आहे. असे असतांना देखील उमेदवाराराच्या संबंधितांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अद्यापतरी विश्वासात घेतले नसल्याचे बोलल्या जात असल्याने भोकर विधानसभा मतदार संघातील महायुती पदाधिकाऱ्यांत काही तरी घडलय बिघडलंय असे निदर्शनास येत असून संबंधितांनी सन्मानपूर्वक विश्वासात घ्यावे अन्यथा भोकर,मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी वरीष्ठांना याबाबतची माहिती देऊन पुढील दिशा आणि भूमिका ठरवतील असे ही शिवसेनेचे मतदार संघ समन्वयक तथा तालुका प्रमुख अमोल धनराज पवार यांनी म्हटले आहे.तर मग पाहुयात यांच्यात काही तरी चांगले घडतय का अधिकच बिघडतय ते ?


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !