Sun. Dec 22nd, 2024

छाननी नंतर १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ६६ उमेदवार पात्र तर ८ जण अपात्र

Spread the love

शनिवार,दि.६ एप्रिल रोजी सायं.६.१५ पर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार ; तर सोमवार,दि.८ एप्रिल रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत अंतिम मुदत

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : दि.५ एप्रिल रोजी १६-नांदेड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्‍या अनुषंगाने करण्यात आलेल्या नामांकन अर्ज छाननीमध्‍ये ६६ उमेदवार पात्र ठरले असून ८ उमेदवार अपात्र ठरले आहेत.तर दि.८ एप्रिल रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत वैध उमेदवारांपैकी ज्यांना आपले उमेदवारी अर्ज परत घ्यायचे असतील त्यांना परत घेता येणार आहेत. त्‍यानंतर दि.८ एप्रिल नंतर १६-नांदेड लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारांची अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहे.
दि.५ एप्रिल २०२४ रोजी जिल्‍हा‍ निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्र यांच्‍यासह प्रशासनातील वरिष्‍ठ अधिका-यांसोबत नियोजन भवन नांदेड येथे उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांची छाननी केली.यावेळी झालेल्‍या बैठकीत अर्ज रद्द करतांना उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला व  कोणत्‍या कारणाने त्‍यांचे उमेदवारी अर्ज रद्द होत आहेत याबद्दलची माहिती दिली.चुकीचे प्रतिज्ञापत्र,सूचकांची संख्‍या,सुरक्षा रक्‍कम जमा न करणे आदी करणांवरून ९ अर्ज रद्द करण्‍यात आले.यात एका इच्‍छूक उमेदवाराचे दोन अर्ज रद्द झाले आहेत.तर दि.४ एप्रिल २०२४ रोजी पर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल केले होते.यापैकी ९ अर्ज आज रद्द करण्‍यात आले असून ६६ उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते.यात काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते.
अपात्र झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत…

अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी सय्यद,माधवराव मुकिंदा गायकवाड,आनंदा धोंडिबा जाधव,सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे,आनंदा पुंडलिकराव वाघमारे, सोपान नवेल पाटील यांचा समावेश आहे.

तर पात्र उमेदवार पुढील प्रमाणे आहेत…
चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भाजप),पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी),वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस),अब्दुल रहीम अहमद (देश जनहित पार्टी),अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी),कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग),राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत),सय्यद तनवीर (बहुजन महा पार्टी), सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी),हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे.   

तर अपक्ष उमेदवार पुढील प्रमाणे आहेत…

अकबर अख्‍तर खॉन,अक्रम रहेमान सय्यद,अनवर अ.कादर अहमद कादर शेख,अमजत खॉ सखर खॉन, अरुण भागाजी साबळे,अश्फाक अहमद,असलम इब्राहिम शेख,शेख इमरान शेख पाशा,इरफान फारूक सईद,मोहम्मद इलियाज अब्दुल वहिद मोहम्मद,कदम सुरज देवेंद्र,कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान,अहमद खालिद अहमद रफीक, गजानन दत्तारामजी धुमाळ,जगदीश लक्ष्मण पोतरे,जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण,जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम,तुकाराम गणपत बिराजदार,थोरात रवींद्र गणपतराव,देविदास गोविंदराव इंगळे,नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन,नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे,निखिल लक्ष्मणराव गर्जे,प्रमोद किसनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख,भास्कर चंपतराव डोईफोडे, मजिद अ.अकबर,मोहम्मद तौफिक मोहम्मद युसुफ,मोहम्मद मुबीन शेख पाशा,मोहम्मद सलीम मोहम्मद इकबाल,महारुद्र केशव पोपळाईतकर,ॲड.मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील,मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल,मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी,युनिस खान,युनिस खाँ युसुफ खाँ,रमेश दौलती माने,राठोड सुरेश गोपीनाथ,लतीफ उल जाफर कुरेशी,लक्ष्मण नागोराव पाटील,ॲड.विजयसिंह चौव्‍हाण,विनयमाला गजानन गायकवाड,वैशाली मारोतराव हुके पाटील,शिवाजी दत्तात्रय गायकवाड,साहेबराव नागोराव गुंडीले,साहेबराव भिवा गजभारे,ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे,शाहरुख खमर,मोहनराव आनंदराव वाघमारे यांचा समावेश आहे.
शनिवार,दि.६ एप्रिल रोजी अर्ज परत घेता येईल…

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची मुदत दि. ८ एप्रिल २०२४ आहे.मात्र शनिवार,दि.६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत.तर सोमवार,दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत.रविवार,दि.७ एप्रिल २०२४ रोजी मात्र सुट्टीचा दिवस आहे.त्‍यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र परत घेता येणार असल्‍याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !