Sat. Dec 21st, 2024

घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेसही आता अजित पवारांचीच-भोकर मध्ये जल्लोष

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,क्रियाशील सदस्य, सदस्य यांचे बहुमत व प्रतिज्ञापत्राच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.त्यामुळे घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची झाली असल्याने राज्य आणि देशात त्यांच्या कार्यकर्त्यांत आनंदोत्सव साजरा केल्या जात असून याच अनुषंगाने भोकर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि.७ फेब्रुवारी रोजी ढोल-ताशा आणि भव्य आतिषबाजीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे सोपवलं होतं.त्याच निकषांवर निवडणूक आयोगाने दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्षही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताब्यात देण्यात आला आहे.त्यामुळे अजित पवार हे आता सदरील पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचा शिक्का मोर्तब झाला आहे.परंतू हा निर्णय माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ नेते शरदचंद्र पवार व त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत धक्कदायक मानला जात आहे.
निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी असल्याची मान्यता दिली आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता पक्ष संपर्क कार्यालयापासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असलेली ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे भव्य आतिषबाजी करण्यात आली आणि “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद,एकच दादा अजित दादा,अजित दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है” चे नारे देत रॅलीचा समारोप करण्यात आला.सदरील रॅलीत व जल्लोषात राष्ट्रवादी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील गौड,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव आनंद पाटील सिंधीकर,ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस नामदेव वाघमारे,उत्तर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माधव देशमुख,अहेमद करखेलीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष एजास कुरेशी,सोसिअल मीडिया उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,तालुका सचिव महेंद्र कांबळे,भोकर शहराध्यक्ष फईमभाई पटेल,सिद्धू पाटील चिंचाळकर,दर्शन डूरे,रवी गेंटेवार,गणेश देशमुख,पंकज देशमुख,सचिन नांदेकर,शेख इब्राहिम,राजू कोरडे,श्याम बोडेवार,सतीश चाटलवार, ॲड.शेख सलीम,ॲड.शेख अल्तमश,शेख जब्बार,तुकाराम महादावाड, शंकर गाढे,राजू पांचाळ,महेंद्र दुधारे,अविनाश आलेवार,विलास गुंडेराव,दिनकर पाटील, विजय पाटील सोळंके,निलेश खांडरे, महोम्मद मझरोद्दीन,दशरथ इंदरवाड,गजानन पाटील सोळंके, साहेबराव वाहूळकर यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !