संदिप पाटील गौड अध्यक्ष असलेली भोकर येथील शिवजयंतीची जंबो कार्यकारिणी गठित
तर स्वागताध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक नेते सुभाष पाटील किन्हाळकर,उत्तम बाबळे,बी.आर.पांचाळ,दिलीप के. राव व सय्यद जुनेद यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भोकर येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदोत्सवात साजरी करण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते संदिप पाटील गौड हे अध्यक्ष असलेल्या सार्वजनिक शिवजयंती मंडळाची जंबो कार्यकारिणी गठित करण्यात आली असून सर्व सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या हेतूने स्वागताध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक नेते तथा बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर,संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ,वंचितचे अध्यक्ष दिलीप के.राव व सय्यद जुनेद यांची ही निवड करण्यात आली आहे.
भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्या निमित्ताने दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी ध्वजारोहण व मानवंदना देण्यात येईल,तर दुपारी याच ठिकाणाहून झांज पथक,लेझीम पथक,भजनी मंडळ, प्रबोधनात्मक देखावे,विविध पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले शिवप्रेमी यांचा सहभाग असलेली भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे.तसेच विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.त्या निमित्ताने संपन्न झालेल्या सर्व समावेशक बैठकीमध्ये सार्वजनिक शिवजयंतीची जंबो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे…अध्यक्ष-संदीप पाटील गौड,उपाध्यक्ष-मोहन राठोड,दीपक वर्षवार,उमेश पाटील कापसे बटाळकर,सचिव-आनंद डांगे, सहसचिव-माधव पाटील बोरगावकर,गोविंद दोडिया, कोषाध्यक्ष-गजू पाटील पोमनाळकर,विजय पवार,सदस्य-नामदेवराव आयलवाड,नागनाथ घिसेवाड,शिवाजीराव पांचाळ, डॉ.यु.एल.जाधव,सतीश देशमुख,संतोष मारकवार,सुरेश बिल्लेवाड,केशव मुद्देवाड,दत्तात्रय पांचाळ,राजेश्वर देशमुख, विठ्ठल फुलारी,गणपत पिट्टेवाड,ॲड.परमेश्वर पांचाळ,प्रशांत पोपशेटवार,तौसीफ इनामदार,मजहर लाला,एल.ए.हिरे,बाबुराव पाटील,बालाजी नार्लेवाड,गोविंद मेटकर,गंगाधर पडवळे,यांसह आदीजण.
तसेच दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली व सर्वानुमते विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार असल्याच्या अनुषंगाने स्वागत समिती गठीत करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी येथील जेष्ठ सामाजिक नेते तथा स्व.डॉ. शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर,संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ,वंचित चे अध्यक्ष दिलीप के.राव,सामाजिक कार्यकर्ते सय्यद जुनेद यांसह आदींची निवड करण्यात आली आहे.तर सल्लागार म्हणून-माधवराव अमृतवाड,ॲड.शेखर कुंटे,डॉ.राम नाईक,आत्रिक पाटील मुंगल,ॲड.शिवाजी कदम, अमोल धनराज पवार,साईप्रसाद जटालवार,साईनाथ राठोड, बाळू मेटकर,मारुती अंगरवार,बालाजी एलपे,निळकंठ वर्षेवार, ॲड.विशाल दंडवे,प्रसिद्धी प्रमुख-आदिनाथ चिंताकुटे,अनिल डोईफोडे,संतोष आनेराये,सम्राट हिरे यांसह आदींची निवड करण्यात आली आहे.