Sun. Dec 22nd, 2024

नव शैक्षणिक उपक्रम : विद्यार्थ्यांसह पालकांचा ही सहलीत समावेश-सौ.रुचिरा बेटकर

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : शिक्षक -विद्यार्थी-पालक यांच्यात सुसंवाद घडून आपसातील अंतरक्रिया दृढ होण्यासाठी शैक्षणिक सहली मध्ये महिला पालकांचाही समावेश करून सहलीचे आयोजन करण्यात यावे याच पार्श्वभूमीवर केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांना ही सहलीत समावेश करुन घेत नव शैक्षणिक उपक्रमाने आनंदोत्सवी सहल आम्ही केली,अशी माहिती मुख्याध्यापिका सौ.रुचिरा बेटकर यांनी दिली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रविवार,दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी सॅटेलाइट डिजिटल पब्लिक स्कूल,गणेश नगर रोड,नांदेड येथील मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेटकर यांनी त्यांच्या शाळेची सहल वारंगा गार्डन येथे विद्यार्थी व महिला पालकांसह नेली आणि महिला पालकांचे विविध खेळ घेऊन त्या खेळात विजेत्यांना बक्षिसे ही देण्यात आली.यावेळी आपले पालक ही सोबत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.पालकांची मुलांसह घेण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत-सौ.सुरेखा रविराज ससाणे,लंगडी मध्ये-सौ.अश्विनी आकाश भदरगे,गट तयार करणे- सौ.आश्लेषा दशरथ सोनकांबळे आणि तळ्यात मळ्यात या स्पर्धेत – सौ.प्रियंका सुनील काळे या महिला पालक प्रथम विजेत्या ठरल्या.
शालेय शिक्षण घेत असताना शालेय सहल हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो.पण यात काहीतरी नवीन्य यावे म्हणून या शाळेने महिला पालकांसह या सहलीचे आयोजन केले आहे.क्षेत्रभेट असो वा शालेय सहल यातून शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यात उत्तम अशी अंतरक्रिया घडून यावी म्हणून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य असे संगोपना संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.नितीन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल नेण्यात आली.नव शैक्षणिक उपक्रमाने यशस्वी झालेल्या या सहलीसाठी कु.सुनिता गायकवाड,सौ.सुचिता इंगोले आणि राधाबाई सोनसळे या शिक्षिकासह,कर्मचारीवृंद आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !