नामदेव वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती
तर भोकर शहर कार्याध्यक्षपदी अविनाशभाऊ आलेवार यांची नियुक्ती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेवरुन भोकर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव लालबाजी वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून भोकर शहर कार्याध्यक्षपदी अविनाश भाऊ आलेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांच्याही नियुक्तीचे पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
सामाजिक चळवळीचा वडीलांचा वारसा असलेल्या नामदेव लालबाजी वाघमारे यांचे आंबेडकरी चळवळ व मातंग समाजातील अनेक आंदोलने आणि न्यायीक कार्यात योगदान आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)मध्ये जाहीर प्रवेश केला होता.नामदेव वाघमारे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पदनियुक्त मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेवरुन इंजि.विश्वंभर पवार यांनी नामदेव वाघमारे यांची उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
याच बरोबर भोकर शहरातील नागरिक व तरुणवर्गात मोठा जनसंपर्क असलेले युवा कार्यकर्ते अविनाश आलेवार यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोकर शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना देखील उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार, भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख व भोकर शहराध्यक्ष फईम पटेल यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
सदरील नियुक्तीपत्र दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी भोकर येथील पक्ष संपर्क कार्यालयात देण्यात आले आहेत.यावेळी उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा पुजाताई व्यवहारे,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,जिल्हा सरचिटणीस रवि गेंटेवार,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,मुदखेड तालुकाध्यक्ष आनंद टिपरसे,तालुका सचिव महेंद्र कांबळे,भोकर शहराध्यक्ष फईम पटेल,ओबीसी विभाग भोकर तालुकाध्यक्ष तुकारामजी महादावाड यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नियुक्तीपत्र बहाल करण्यात आल्यानंतर उपरोक्त सर्वांसह उपस्थित कार्यकर्त्यांनी उभयंतांचाही यथोचित सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.दलित,मागासवर्गीय व आदींत नामदेव वाघमारे यांचा मोठा जनसंपर्क असल्याने व तरुणांत अविनाश आलेवार यांचा संपर्क मोठा असल्याने पक्ष बळकटीकरणासाठी या दोघांचीही नियुक्ती उपयुक्त ठरणार असल्याने पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने देखील त्यांना पुढील सेवाकार्यासाठी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!