जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संकल्प अकॅडमी भोकरच्या विद्यार्थ्यांचे केले विशेष कौतुक!
राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे संकल्प अकॅडमी,भोकर च्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य !
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय,नियोजन भवन नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात संकल्प अकॅडमी,भोकरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून समाजाला एक अभिनव दिशादर्शी संदेश दिला असून त्यांच्या अभिनयातून प्रकटलेल्या संदेशाचे नांदेड जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांनी कौतूक करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सद्यस्थितीत १२ वी नंतर विद्यार्थी हे डॉक्टर आणि इंजिनियर ह्या दोनच पदाच्या प्राप्ती साठी धडपड करत असतांना दिसत आहेत.पण यात प्रत्येकाला यश मिळेल असे नाही आणि यश न मिळालेले विद्यार्थी मग चुकीच पाऊल उचलून आयुष्य संपवताना दिसत आहेत.तर भविष्यात उपलब्ध असणाऱ्या करीअरच्या विविध पर्यायाची विद्यार्थ्याना जाणीव करून देणारे व निवडणूक वेळी कोणत्याही दारू,पैशा सारख्या अमिषाला बळी न पडता मतदाराने मतदान करून योग्य उमेदवार निवडून आणला पाहिजे.तसेच आपला आणि देशाचा विकास साधावा असा संदेश देणारे पथनाट्य संकल्प ॲकडमी भोकर च्या विद्यार्थ्यांनी सादर केले आहे..
या पथनाट्य चमूत ॲकडमीच्या शिवम राठोड,चक्रधर कदम, कु.प्रांजल सुवर्णकार,कु.अनुष्का कोकाटे,कु.प्रतीक्षा सोळंके, कु.तनुजा गायकवाड,कु.ईश्वरी कुऱ्हाडे,कु.ऋतिका कल्याणकर, रितेश राठोड,आदित्य गडपाळे,अरुण जाधव,प्रतीक तेलंगे, श्रीकांत झुकरे आणि कृष्णा कदम या विद्यार्थी कलाकारांचा समावेश होता.
या सादरीकरणाबद्दल संकल्प अकॅडमीचे संचालक कुशल देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत,नांदेड दक्षिण मध्य रेल्वे चे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार,महाराष्ट्र राज्य निवडणूक दूत डॉ.सान्वी जेठवाणी,अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाण,मतदान नोंदणी अधिकारी,विकास माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संकल्प अकॅडमीचां महत्वाकांक्षी संकल्प…
भविष्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर ऑप्शन ची विद्यार्थ्याना जाणीव व्हावी,तसेच १२ वी नंतर विद्यार्थ्यानी डॉक्टर किंवा इंजिनीयर या दोन पर्यायातच आडकुन न राहता, राष्ट्रीय स्तरावरील सर्वच पदांसाठी तयारी करणे.जसे की युपीएसी सारख्या परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. तसेच मतदान दिनाबदल जनजागृती करणे व त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास साधणे,हा संकल्प अकॅडमी चा नवा संकल्प असून सर्व कलाकार विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आणि सर्वांगिण विकासाचा संकल्प केला आहे.