Sat. Jan 11th, 2025

भोकर येथील नमो नव मतदाता संमेलनास खा.प्रतापराव चिखलीकर उपस्थित राहणार!

Spread the love

भोकर विधानसभा संयोजक श्रीकांत किन्हाळकर यांनी दिली माहिती…

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून नवीन मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो नव मतदाता संमेलनाचा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.याच अनुषंगाने भोकर येथे दि.२५ जानेवारी रोजी नमो नव मतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून सदरील संमेलनास मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती भोकर विधानसभा संयोजक श्रीकांत पाटील किन्हाळकर यांनी दिली असून नव मतदारांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन मतदार व युवकांची अधिकाधिक मतदार नोंदणी करुण घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो नव मतदाता संमेलनचा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी च्या वतीने दि.२५ जानेवारी २०२४ रोजी माऊली मंगल कार्यालय,किनवट रोड भोकर जि.नांदेड येथे सकाळी १०:०० वाजता नमो नव मतदाता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील संमेलनास नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड लोकसभा मतदारसंघ प्रभारी प्रणिताताई देवरे चिखलीकर,संघटन मंत्री गंगाधरराव जोशी,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख,संदीप राठोड व आदी मान्यवरांची ही उपस्थिती राहणार आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून नवीन मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी विविध माध्यमे तयार करून दिली आहेत.तसेच सर्व कार्यकर्त्यांना नवीन मतदारापर्यंत पोहोचण्यासाठीची ही नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संमेलनाचे व्यवस्थापन व संमेलनाच्या पार्श्वभूमीची माहिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतः देणार असून प्रदेश कार्यकारिणी चे वरिष्ठ पदाधिकारी या उपक्रमावर लक्ष ठेवून आहेत.तसेच भाजपाने नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अजिंठा सदरील उपक्रमातून अग्रस्थानी ठेवलेला आहे.तरी नमो नव मतदाता संमेलनात जास्तीत जास्त नवयुवकांनी सहभाग घेऊन आपले पहिले मत हे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी द्यावे.यासाठी होऊ घातलेल्या संमेलनात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भोकर विधानसभा संयोजक श्रीकांत पाटील किन्हाळकर यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !