Mon. Dec 23rd, 2024

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते साहित्यिका सौ.रुचिरा बेटकर यांना समाज भुषण पुरस्कार प्रदान

Spread the love

संवेदनशील साहित्याची दखल घेऊन त्यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भुषण पुरस्काराने’ करण्यात आले सन्मानित

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : ‘त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर’ यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या पार्श्वभूमीवर व ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या १९३ व्या जयंतीचे औचित्य साधून बुद्धिष्ट रिसर्च फाऊंडेशन नांदेड यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात दि.७ जानेवारी रोजी अनेक साहित्यिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मराठी साहित्यिक क्षेत्रात भरघोस लेखन करणार्या प्रसिद्ध संवेदनशील लेखिका व कवयित्री सौ.रुचिरा बेटकर यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भुषण पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या या यशाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

बुद्धिष्ट रिसर्च फाऊंडेशन नांदेड व पुरस्कार वितरण संयोजन समितीच्या वतीने दि.७ जानेवारी २०२४ रोजी नांदेड येथे ‘सावित्री- रमाई’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.याच कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मराठी साहित्यिक क्षेत्रात भरघोस लेखन करणार्या प्रसिद्ध संवेदनशील लेखिका व कवयित्री सौ. रुचिरा बेटकर यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर,कार्यक्रम संयोजन समिती अध्यक्षा सौ.अंजली मुनेश्वर यांसह आदींची उपस्थिती होती.
साहित्यिका सौ.रुचिरा बेटकर यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला असून यापूर्वी दि.१० डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे ‘वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच २०१९ मध्ये देखील त्यांना ‘जीवन गौरव पुरस्काराने’ ही सन्मानित करण्यात आले आहे.अद्याप त्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झालेले नसले तरी त्यांनी विविध मासिक अंक,दैनिक वृत्तपत्र,साप्ताहिकांसह आदी माध्यमातून सातत्याने संवेदनशील लिखान केलेले आहे व त्यांच्या त्या साहित्याची वेळोवेळी दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.तर सौ.रुचिरा बेटकर यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भुषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल साहित्यिक,सामाजिक व मित्र परिवाराकडून आणि सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. तसेच अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !