दिगांबर तिडके देगावकर यांचा राष्ट्रवादी(अजित पवार गट)मध्ये जाहीर प्रवेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : राज्याचे क्रियाशील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वांभर पवार यांच्या नेतृत्वार विश्वास ठेऊन युवा सामाजिक कार्यकर्ते दिगांबर अंबादासराव तिडके देगावकर यांसह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) मध्ये प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशाचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष,नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक इंजि.विश्वंभर पवार यांची जिल्हाध्यक्षपदी व राजेश्वर कदम देशमुख यांची भोकर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून सातत्याने असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होत असून पक्ष वाढीने मोठी गती घेतलेली आहे.दि.४ जानेवारी २०२४ रोजी नांदेड जिल्हा संपर्क कार्यालय येथे त्यांच्या व राज्याचे विकसनशील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन युवा सामाजिक कार्यकर्ते दिगांबर अंबादासराव तिडके देगावकर, हनमंत सदाशिवराव तिडके,संतोष पाटील सोळंके वाजेगावकर,सुधाकर पाटील चौळाखेकर यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.या पक्ष प्रवेश समयी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील गौड,भोकर तालुका अध्यक्ष राजेश्वर कदम,हिमायतनगर तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे,सरचिटणीस राजू पाटील जाधव हस्सापूरकर,युवक शहर जिल्हा सहाय्यक तैनिंदरसिंघ ढाकणीवाले,सेवादल जिल्हाध्यक्ष शंकर गाडे दिवशीकर यांसह आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा व अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढणारा पक्ष आहे.तसेच सर्व जनतेसह कार्यकर्त्यांनाही न्याय,योग्य सन्मान देणारा पक्ष आहे.म्हणूनच बहुसंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करत आहेत. आज ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही व पक्षात सर्वांना मानसन्मान मिळेल आणि पुढे प्रत्येकाच्या कार्यक्षमतेनुसार त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी टाकल्या जाईल.या प्रसंगी जिल्हा पदाधिकाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती होती.सर्व उपस्थितांनी पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत,अभिनंदन केले असून पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.