Sat. Dec 21st, 2024
Spread the love

श्रीराम मंदिर लोकार्पणपुर्व पवित्र अक्षतांचे घरोघरी होणार वाटप

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : श्री अयोद्या धाम येथून भोकर शहरात दाखल झालेल्या अक्षता व कलशाचे पुजन करण्यात येऊन श्रीरामाच्या जयघोषात दि.३० डिसेंबर रोजी शहरातील मुख्य रस्त्याने बहुसंख्य महिला,पुरुष आणि श्रीराम भक्त सहभागी झालेली भव्य अक्षता कलश पुजन पदयात्रा संपन्न झाली.

दि.३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री अयोध्या धाम येथून शहरात दाखल झालेल्या पवित्र अक्षता कलशाची पदयात्रेचा श्री विश्वकर्मा मंदीर दसरा हनुमान मंदिर परीसर येथून प्रारंभ करण्यात आला व ही पदयात्रा आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक,बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदीर जिनिंग,श्री बालाजी मंदीर,म.गांधी चौक मार्गे श्री राम मंदीर येथे पोहचली आणि श्रीरामाचा जयघोषात करत निघालेल्या या पदयात्रेचा तेथे समारोप करण्यात आला.या भव्य पदयात्रेत श्री दत्तसंस्थान कैलास गडाचे महंत उत्तमबन महाराज,महंत परमेश्वर महाराज,संत,महंत,शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, महिला,अयप्पा स्वामी भक्त,श्रीराम भक्त यांसह बहुसंख्य नागरिकांचा सहभाग होता.
श्रीराम जन्मभूमी अयोध्येला श्रीराम मंदीरात रामलल्लाच्या मुर्तीची दि.२२ जानेवारी २०२३ रोजी बालस्वरुपात प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.याप्रसंगाचे औचित्य साधून या दिवशी संपुर्ण देशभरात प्रतिदिवाळीसम सण-उत्सव साजरा होणार आहे.याच अनुषंगाने श्री अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशातील अक्षतांचे भोकर तालुक्यातील गाव,वस्ती,तांडे व शहरातील घरोघरी वाटप होणार असून त्यामध्ये हिंदू समाजाकडुन भोकर तालुका अयोध्येसारखा सजविण्यात येणार आहे.यानिमित्ताने भोकर मध्ये विहिंप,बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाजाकडून भव्य अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.तर सदरील पदयात्रे दरम्यान पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !