मरणोत्तर देहदानाच्या संकल्पाने ‘भोसले दांपत्य’ करणार नववर्षाचे स्वागत
त्यांच्या स्तुत्य निर्णयाचे विविध स्तरातून होत आहे अभिनंदन!
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा आरोग्य विभागातील हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड येथे प्रयोगशाऴा वैज्ञानिक अधिकारी म्हणून सेवारत असलेले संजय व्यंकटराव भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुनिता भोसले दोघे ही रा.नांदेड या दांपत्यांनी नवीन वर्षाेचे स्वागत एका अभिनव आणि सुंदर कल्पक भावनेतून करण्याचा निर्णय घेतला आहे.या दांपत्याने मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केेेली असून दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी प्राध्यापक व विभाग प्रमुख,शरीररचना विभाग डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्याकडे रितसर नोंदणी प्रक्रिया केली आहे.
भोसले दांपत्य हे आरोग्य विभागात अगदी सामाजिक सेवाभावाने कर्तव्य बजावतात.’दान करावे तर ते दान इतरांच्या हयातीत महत्त्वपुर्ण व अजीवन उपयोगी ठरावे!’ अशी त्यांची उदात्त भावना आहे.आणि त्यात देहदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे, असे ते नेहमीच इतरांना सांगतात.केवळ सांगतच नाहीत तर या दांपत्याने स्वतः मरणोत्तर देहदान करण्याची रितसर प्रक्रिया करुन नववर्षाचे स्वागत करण्याचा अभिनंदनिय निर्णय घेतला आहे.भोसले दांपत्याचा हा स्तुत्य निर्णय सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे मत अनेकांतून व्यक्त होत आहे.त्यांच्या सर्व सहकारी कर्मचारी,अधिकारी व मित्र परिवाराने या संकल्पनेचे जोरदार स्वागत आणि कौतूक केले असून मरणोत्तर देहदान करणाऱ्या या दांपत्याचे येत्या प्रजाकसत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्याचे ठरविण्यात आले आहे.तसेत त्यांच्या या उदात्त संकल्पनेतून सर्व कर्मचाऱ्यांसह आदींना प्रेरणा मिळेल व मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा होईल अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत असून या दांपत्यांच्या मरणोत्तर देहदान संकल्पा बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.आकाश देशमुख,कार्यालयीन अधिक्षक कैलास सावळे,सहाय्यक अधिक्षक विजय चव्हाण,माधव पाटील शिंदे, चेअरमन सुभाष कल्याणकर,पप्पू देसाई नाईक,गणेश सातपुते, मोहन पेंढारे,माणिक गिते,सत्यजीत टिप्रेसवार,व्यंकटेश पुलकंठवार,माधव कोल्हे,चंद्रभान धोंडगे,सचिन दळवी,पांडुरंग बोरकर,बालाजी केंद्रे,शंकर दंतुलवार,कैलास कल्याणकर, रघुनाथ हुंबे,श्याम सावंत,किरण कुलकर्णी,गजानन अल्लापुरे, भारत हाम्पले,जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथक नांदेड अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.