Mon. Dec 23rd, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी पाटील गौड

Spread the love

तर ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी आनंद डांगे यांची नियुक्ती

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आगामी लोकसभा व विविध निवडणूकीचा अनुषंगाने पक्ष संघटन वाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने( अजित दादा पवार गट) पक्षांतर्गतच्या विविध विभाग कार्यकारिणीच्या पदाधिकारी नियुक्तीचे  सत्र सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रदेश कार्यकारिणी,जिल्हा कार्यकारिणीसह आदी पदांकरीता अनेक पदाधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती केली असून भोकर येथील धडाडीचे युवा नेतृत्व बालाजी पाटील गौड यांची प्रदेश उपाध्यक्षपदी व उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी आनंद डांगे यांची नियुक्ती केली आहे. सदरील नियुक्तीचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध विभाग कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असून ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रदेश कार्यकारिणीसाठी प्रदेश पदाधिकारी,सदस्य व विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष,जिल्हा कार्याध्यक्ष या पदांवरील पदाधिका-यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत.यात भोकर जि.नांदेड येथील धडाडीचे युवा सामाजिक नेतृत्व बालाजी पाटील गौड यांची ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.तर येथीलच युवा उद्योजक आनंद डांगे यांची ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
उभयंतांनाही दिलेल्या जवाबदारीच्या माध्यमातून निःस्वार्थ समाजसेवा घडावी व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आणि,पक्ष संघटन वाढीस मदत व्हावी अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली असून उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष (फादर बॉडी) इंजि. विश्वंभर पवार,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांसह आदींनी पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !