संविधान सन्मान महासभेस सहभागी होण्यासाठी भोकर येथील अनेकजण मुंबईत दाखल
वंचित बहुजन आघाडी चे भोकर तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते झाले होते मुंबईस रवाना
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे राष्ट्रिय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमूख उपस्थितीत आज दि.२५ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदान मुंबई येथे संविधान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.या महासभेत सहभागी होण्यासाठी भोकर तालुक्यात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जनजागृती व आवाहन करण्यात आले होते.यास प्रचंड प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ नोव्हेंबर रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा जत्था नंदीग्राम एक्स्प्रेस ने रवाना झाला असून ते सर्वजण आज महासभेत सहभागी होणार आहेत.
समता,बंधुता,न्याय,राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता मूल्यांचा समाजामध्ये प्रचार- प्रचार व्हावा या हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे राष्ट्रिय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमूख उपस्थितीत संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी शिवाजी पार्क मैदान मुंबई येथे संविधान महा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेत राज्यातील हजारो संविधान प्रेमी सहभागी होणार आहेत.यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका भोकर च्या वतीने भोकर शहर व तालुक्यात तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांच्या नेतृत्वाखाली माजी तालुकाध्यक्ष सुभाष तेले,तालुका महासचिव व्यंकट वाडेकर,तालुका उपाध्यक्ष आनंदराव एडके, बाबूराव कदम,शहराध्यक्ष शेख रहिम,महीला आघाडी तालुकाध्यक्षा अनिताताई वाघमारे,उपाध्यक्ष गंगाधर कदम, उपाध्यक्ष ग्यानु चव्हाण,सत्यपाल कदम,गौतम चव्हाण,विठ्ठल चव्हाण,भीम टायगर सेनेचे मिलिंद गायकवाड,प्रहार चे राजेश चंद्रे,दिलिप चव्हाण,पुंडलिक कांबळे,भाऊराव शिंदे,चंद्रकांत चव्हाण,अशोक कदम,शिवाजी झंपलवाड,अविनाश गायकवाड,नारायण कदम,उत्तम पाईकराव,मारोती वाघमारे, माधव गोलावार,गंगाधर गुंडेराव,गणपत जाधव,फुलाजी चव्हाण,माधव कांबळे,गंगाधर शेळके,राहुल जाधव,सय्यद अल्ताफ,अशोक धमसे,साहेबराव सावळे,भारत बाई दुधारे, सुशिलाबाई दुधारे,रमाबाई,शंकर गायकवाड,प्रभाकर उघडेराव, शेख सोहेल,गोविंद ढगारे,शेख शबिर,संजू गिरी,किरण ढगारे, अहमद शेख,नामदेव उघडेराव, भीमराव हनवते,भारतबाई गायकवाड,भिमराव उघडेराव यांच्यासह आदींनी तालुक्यात जनजागृती केली होती.तसेच मुंबईस जाण्यासाठी आवाहन ही केले होते.
तालुकाध्यक्ष दिलीप के.राव व सर्व पदाधिकाऱ्यांच्या आवाहनास तालुका आणि शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह असंख्य संविधान प्रेमी तथा आंबेडकरी चळवळीच्या विचार अनुयायी महिला,पुरुषांनी प्रचंड प्रतिसाद दिला.तसेच ही दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी शिवाजी पार्क मैदान,मुंबई येथे होत असलेल्या संविधान महासभेत सहभागी होण्यासाठी दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी रेल्वे स्थानक भोकर येथे मोठ्या संख्येने एकत्र आले व नंदीग्राम एक्स्प्रेस ने मुंबईकडे रवाना झाले.आज सकाळी ते सर्वजण मुंबईत दाखल झाले असून महासभेत सहभागी होणार आहेत.दिलीप के.राव यांची वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा भोकर च्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्ष वाढ व बळकटी निर्माण होत असून अनेकजण पक्ष प्रवेश करत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.