Sat. Jan 11th, 2025

पाणवन येथील मातंग महिलेस व निळा येथील युवकास मारहाण करणार्‍याविरूद्ध मोक्का लावा

Spread the love

मोक्का कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याची अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनने केली मागणी

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : मौ.पाणवन ता.माण जि.सातारा येथील मातंग समाजातील महिला शाहिदा तुपे यांना भररस्त्यात चौकात बेशुद्ध होईपर्यंत व बेशुद्ध झाल्यावरही मारहाण केली आणि एका महिलेवर सामुहिक हल्ला केला.या प्रकरणी सवर्ण समाजातील त्या आरोपीविरूद्ध कठोरातील कठोर कार्यवाहीचे निर्देश द्यावेत.तसेच मौ. निळा ता.जि.नांदेड येथील मातंग युवक लखन रामा खंदारे यांचेवर सवर्ण मराठा जातीतील काही जातीवादी लोकांनी खुनी हल्ला केला. प्रकरणीही त्या आरोपींविरूद्ध तात्काळ मोक्का कायद्यांतर्गत कार्यवाही करावी,या मागणीचे निवेदन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

उपरोक्त घटना या अमानवी असून महाराष्ट्राचे मन हेलावून टाकणाऱ्या आहेत.या घटनांतून महाराष्ट्रातील दलित समाजात प्रचंड दहशत पसरली असून याच पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयद्वेषी,अत्याचारी मंडळींकडून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात दलित, मातंग सुरक्षित नसून अतिशय क्रूर घटना एकामागून एक महाराष्ट्रात घडत आहेत. राज्यातील शासक सरकार व त्यांची पोलीस यंत्रणा दलितांना सुरक्षिततेची हमी देणार की नाही ? दलितांचे होणारे हत्याकांड तुम्ही गंभीरपणे घेणार की नाही ? दलितांच्या हत्यांची मालिका कधी थांबवणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.याचे उत्तर व सुरक्षिततेची हमी हे सरकार देणार की नाही असा सवाल शासनास विचारला जात असून उपरोक्त निंदणीय,अमानवीय क्रूर घटनांचा अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन आणि विविध सामाजिक संघटना,कार्यकर्ते,तसेच सकल शोषित अत्याचारग्रस्त समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

वरील सर्व घटनांतील आरोपींविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही करावी.वरील घटनांचा तपास हा निःपक्ष व जलदगतीने पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून किंवा सीआयडीमार्फत चौकशी पूर्ण करण्यात यावी.पाणवन ता.माण येथील शाहिदा तुपे व मौजे निळा ता.जि.नांदेड येथील मातंग युवक लखन खंदारे यांच्या मारहाणीचे खटले लढण्यासाठी अनुभवी तथा तज्ञ विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात यावी,यांसह आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.निवेदन देण्यात आलेल्या शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, राज्य सचिव शिवाजीराव नुरूंदे,मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर,निलेश तादलापूरकर,मानवी हक्क अभियानाचे मच्छिंद्रभाऊ गवाले,सामाजिक कार्यकर्ते राहुल तेलंग,एन.डी.रोडे,कॉ.दिबंगर घायाळे,अ‍ॅड. विष्णू गोडबोले,देवीदास लिंगायत,माजी सैनिक यादवराव वाघमारे,शशिकांत तादलापूरकर,नागेश तादलापूरकर,प्रा.देवीदास इंगळे,शंकरराव गायकवाड,संतोष पारधे,यादव गाडे,आनंद वंजारे,गौतम शिरसाठ,रमेश सूर्यवंशी,शिवाजी सोनटक्के,इंजि.एस.पी.राखे, महादेव कसबे,चंद्रभान सूर्यवंशी,उत्तमराव वाघमारे,सुरेश कांबळे,विठ्ठलराव सूर्यवंशी, जयवंतराव वाघमारे आदीजण सहभागी होते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !