Sat. Apr 19th, 2025

भोकर येथील रघुवंशी परिवार देवदर्शनाला गेले व चोरट्यांनी घरुन ७३ हजारांचे ऐवज चोरले

Spread the love

बाहेर गावी जातांना नागरिकांनी किमती ऐवज घरी ठेऊन नयेत-पो.नि.नानासाहेब उबाळे

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शहीद प्रफुल्ल नगर भोकर येथील रघुवंशी परिवार देवदर्शनासाठी गेल्याचे साधून त्याच्या घराचे कुलूप कडी तोडू चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी भोकर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील महागडे वातानुकूलित यंत्र चोरल्याची घटना ताजी असून या गुन्ह्यातील एका अट्टल घरफोड्यास गजाआड करण्यात भोकर पोलीसांना यश आले आहे. त्याच्याकडून एक कार व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एक आरोपी फरार आहे.त्या आरोपींचा शोध घेण्यासह पुढील अधिक तपास पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.दिगंबर पाटील हे करत आहेत.

भोकर शहरातील चोरीची मालीका सुरुच असून नुकतेच असे झाले आहे की,शहीद प्रफुल्ल नगर भोकर येथील रहिवासी बलरामसिंह विठ्ठलसिंह रघुवंशी हे दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी सहकुटूंब श्री तिरुपती देवदर्शनाला गेले होते.घराला कुलूप असलल्याचे व घरी कोणीही नसल्याची नामी संधी साधून चोरट्यांनी त्या घराचे कुलूप कडी तोडून आत प्रवेश केला.तसेच कपाटातील दोन तोळे वजनाच्या व अंदाजित २५ हजार रुपयाच्या वापरातील जुन्या सोन्याच्या अंगठ्या, अंदाजे ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडले व चैन आणि रोख रक्कम ४५ हजार रुपये असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.रघुवंशी परिवार देवदर्शन करुन दि.११ ऑगस्ट रोजी घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप कडी तोडून कोणी तरी चोरी केल्याचे निदर्शनास आले.ही चोरी दि.७ ते ११ ऑगस्ट २०२३ रोजीच्या पहाटे ५:०० वाजताच्या दरम्यान झाली असावी.बलरामसिंह रघुवंशी यांनी पोलीस ठाणे गाठले व रितसर फिर्याद दिली.यावरुन दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी गु.र.नं.२८९/ २०२३ कलम ४५४,४५७,३८० भा.दं.वि.प्रमाणे भोकर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार नामदेव जाधव हे करत आहेत.

बाहेर गावी जातांना नागरिकांनी किमती ऐवज घरी ठेऊन नयेत-पो.नि.नानासाहेब उबाळे

बऱ्याच वेळा खासगी कामानिमित्त नागरिक सहकुटूंब बाहेरगावी जातात.घरी कोणीही नसल्याची नामी संधी साधून चोरटे याचा फायदा घेत असतात.त्यामुळे कुटूंबातील सर्व सदस्य बाहेर गावी जात असतील तर त्यांनी घरी सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम व किमती वस्तू घरी न ठेवता सोबत घेऊन जाव्यात.तसेच घरी कोणीतरी ठेऊनच जावे किंवा ते सारे ऐवज सुरक्षित राहील अशी व्यवस्था करावी व आपला किमती ऐवज जपण्याची काळजी नागरिकांनी घ्यावी,असे आवाहन भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !