Mon. Dec 23rd, 2024

जुन्या आरोपींच्या चौकशीत भोकर पोलीसांना एक अट्टल घरफोड्या मिळाला

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील जुन्या आरोपींची उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी मोहिम राबविण्यात आली असता चौकशी दरम्यान भोकर पोलीसांना यश आले असून यात एक अट्टल घरफोड्या हाती लागला आहे.

दरम्यानच्या काळात जबरी चोरी,चोरी,घरपोडी,दरोडा यासारख्या गुन्ह्यात वाढ झाल्याने यापूर्वी दाखल झालेल्या गुन्यातील अटक आरोपी,जामीनावर असलेले व अनेक वर्षापुर्वी ज्यांची अशा गुन्ह्यात नोंद झालेली आहे.अशा आरोपींची चौकशी करून ते सध्या काय करतात,कोठे राहतात,त्यांचे मित्र कोण,नातेवाईक कोण आहेत,याबाबत माहिती घेण्यासाठी व त्यांच्यावर वचक रहावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक व नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील आरोपींची चौकशी मोहिम राबविण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी ही चौकशी मोहिम राबविली.

पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी,पो.उप.नि. दिगांबर पाटील,पो.उप.नि.राम कराड,महिला पो.उप. नि.राणी भोंडवे,सहाय्यक पो.उप.नि.दिलीप जाधव, सहाय्यक पो.उप.नि.संभाजी हनवते,सहाय्यक पो.उप. नि.संभाजी देवकांबळे,जमादार सोनाजी कानगुले, जमादार नामदेव जाधव,जमादार भीमराव जाधव, जमादार रवि मुधोळे,पो.कॉ.प्रमोद जोंधळे,पो.कॉ. नामदेव शिरोळे यांनी तालुक्यातील अशा आरोपींना दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी मोठे परिश्रम घेऊन भोकर पोलीस ठाण्यात आणले व त्यांची कसून चौकशी केली असता या चौकशी दरम्यान गु.र.नं.३६३/२३ कलम ४५८,३८० भा.द.वि.आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा गुन्ह्यातील एक अट्टल घरफोड्या पोलीसांच्या हाती लागला आहे.त्या आरोपीचे नाव व्यंकट गोविंद निलेवाड रा.भोकर असून सदरील आरोपीने काही दिवसांपुर्वीच शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वातानुकूलित यंत्रांची (एसी) चोरी केली होती. तर त्या आरोपीस पकडून आणण्यासाठी जमादार सोनाजी कानगुले व पो.कॉ.प्रमोद जोंधळे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.सदरील आरोपीस भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पो.नि. नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, झालेल्या चौकशी मोहिमेत आम्हास हे यश आले असून यापुढे ही अशा प्रकारे चौकशी मोहिम आम्ही राबविणार आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !