नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे झाले लोकार्पण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या हस्ते झाले उद्घाटन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभाजनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने राज्यात पक्ष वाढ व बांधणीसाठी वेग घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टी चे संपर्क कार्यालय सर्व प्रथम नांदेडमध्ये उभारण्यात आले आहे. भोकर तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांनी हे संपर्क कार्यालय उभारले असून दि.३१ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
अजित पवार यांनी अनेक आमदार व खासदार आपल्यासोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला.आपल्या सोबत आलेल्या आमदारांना मंत्रीपद मिळवून देत ते उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.विद्यमान राज्य सरकारमध्ये सहभागी होऊन राज्यातील अनेक विकासकामे मार्गी लावत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा मोठा प्रयत्न राहणार आहे.आणि हे करतांना नागरिकांना मुंबई पर्यंत न येता आपल्या समस्या तालुका व जिल्हा स्तरावर मांडता याव्यात आणि पक्ष वाढीसह कार्यकर्ता बांधणीसाठी त्या त्या ठिकाणी संपर्क कार्यालय असावे,तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची सदस्य नोंदणी करून घेण्यासाठी आणि गोरगरिब, गरजू नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पक्षाचे संपर्क कार्यालय असावे. याकरिता तालुका व जिल्हा स्तरावर संपर्क कार्यालय उभारावेत,असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले होते.त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत भोकर तालुकाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यांनी आपल्या सहकारी पदाधिकारी बांधवाच्या सहकार्यातून राज्य व मराठवाड्यात सर्वप्रथम नांदेड येथील हॉटेल ताज पाटील जवळ राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) पार्टी चे संपर्क कार्यालय उभारले.त्या भव्य अशा संपर्क कार्यालयाचे दि.३१ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या संपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातून आलेले पक्षाचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.भोकर तालुकाध्यक्ष इंजि.विश्वाभंर पवार यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या या संपर्क कार्यालयाचा आगामी लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा उपयोग होणार आहे.त्यामुळे उद्घाटक सुरेशदादा चव्हाण यांनी यावेळी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करत पुढील पक्ष वाढ आणि बांधणीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सदरील कार्यक्रमास इंजि.विश्वाभंर पवार,जिवन पाटील घोगरे,जिल्हा उपाध्यक्ष शेख जवाजोद्दीन बरबडेकर,भोकर शहराध्यक्ष डॉ.फेरोज खान इनामदार, फेरोज पटेल,अमर पाटील,मोहसीन खान,ॲड.सचिन जाधव, विद्यार्थी आघाडीचे कन्हैया कदम,तालुका सचिव रवि गेंटेवार, तालुका उपाध्यक्ष आनंद पाटील सिंधीकर,तालुका कोषाध्यक्ष बालाजी पाटील गौड, तालुका संघटक संजय पाटील,युवक तालुका अध्यक्ष गणेश बोलेवार, युवक शहराध्यक्ष अफरोज पठाण, मुखेड विधानसभा अध्यक्ष प्रताप पाटील चौधरी, बालाजी पाटील संगवीकर,रमाकांत पाटील जाहूरकर, अमोल पाटील गोजेगावकर, निखील पाटील पळसवाडीकर,भोकर विधानसभा सचिव विशाल महाजन,जिल्हा कार्याध्यक्ष सुनंदाताई जोगदंड,मुदखेड तालुका अध्यक्ष पूजाताई व्यवहारे,भोकर महिला शहराध्यक्ष चद्रकलाबाई गायकवाड,शशिकांत पाटील क्षीरसागर,अर्धापूर माजी तालुकाध्यक्ष,अमोल पाटील रुईकर,डॉक्टर सेल भोकर तालुका अध्यक्ष डॉ.विजय बोंधीलवाड,उद्योग व्यापारी सेल अध्यक्ष कल्याणे, बालाजी पाटील सांगवीकर,मुदखेड शहराध्यक्ष महबूब बुर्हान,हनुमंत नटुरे मुदखेड,पंकज देशमुख भोसीकर, सिद्धेश्वर पाटील ढवळे,बाळासाहेब पाटील येलुरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष योगेश पाटील काळेवार, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष खुद्दुस कुरेशी, आशिष अनंतवार यांसह अनेकांची उपस्थिती होती.