भोकर तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार व अजित पवार गट) व उबाठा शिवसेनेने केली निवेदनाद्वारे मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील अनेक गावांत दि.२६ ते २८ जुलै रोजी पावसाने हाहाकार पसरविला होता. संततधार धो धो पाऊस बरसल्याने अनेक नदी नाले दुथडी भरुन वाहिले.त्यामुळे काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अनेक घरांत पाणी शिरले व घरांची पडझड ही झाली. तसेच हजारो हेक्टर खरीप शेती पाण्याखाली गेली.तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.म्हणून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे व घरांची पडझड झाली आहे त्या नागरिकांना ही नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट व अजित पवार गट),उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने भोकर उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.तसेच माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांनी देखील पाऊस व पूर बाधित क्षेत्राची पाहणी केली असून योग्य ते पंचनामे करून तात्काळ शासनाने मदत करावी,असे म्हटले आहे.
उपरोक्त चार पक्षांच्या शिष्टमंडळानी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार भोकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,कृषि मंत्री व राज्य शासनास पाठविलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की,तालुक्यात प्रारंभी पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता व नंतर पाऊस पडल्याने उशिरा पेरण्या झाल्या. कशीबशी कोवळी पिके वाया खात बोलू लागलेली असतांनाच दि.२६ जुलै २०२३ रोजी रात्री वरूणराजाने दमदार हजेरी लावली व संततधार अतिवृष्टी सदृश पाऊस धो धो बरसल्याने नदी,नाले दुथडी वाहिले आणि तलाव तुडूंब भरले आहेत.नदी नाल्यांना आलेल्या पुरांमुळे पुलावरुन पाणी वाहिल्याने काही गावांचा संपर्क तुटला.तर काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अनेक घरांत पुराचे पाणी शिरले.तर तेलगंणा राज्य सिमेलगत असलेल्या लगळूद,रावणगाव, महागाव,दिवशी खु.दिवशी बु.,रेणापूर गावात सुधा नदी व गडन्ना सुधा वाघू प्रकल्पातील बॅकवाटरचे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली आहे.तर नदिलगतच्या शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले परिणामी कोवळ्या खरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.तसेच सखल भागात पाणी साचल्याने व पिके खरडून गेल्याने हजारों हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामळे भोकर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याच बरोबर घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.त्यामुळे शासनाने तालुक्यातील नुकसान भागांची त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत व भोकर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाईपर अनुदान देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने देण्यात आले निवेदन
भोकर तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमेटी,शहर काँग्रेस कमेटी,युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने एका शिष्टमंडळाने निवेदन दिले असून त्यावर तालूका अध्यक्ष भगवान दंडवे,सभापती जगदीश पाटील भोसीकर, नामदेव आयलवाड,माजी जि.प.सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, संचालक गणेश राठोड,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्रिक पाटील मुंगल बेंबरकर,विठ्ठल पाटील धोंडगे, अल्पसंख्याक कमिटीचे तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,संचालक केशव पाटील पोमनाळकर,माजी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,अनिता साबळे, सुलोचणाबाई ढोले,माजी नगरसेवक मनोज गिमेकर, संचालक रामचंद्र मूसळे,श्रीकांत दरबस्तवार,विक्रम क्षिरसागर, मधूकर गोंवदे,संदीप पाटील गौड,संचालक उज्वल केसराळे,गंपु पाटील,राजकुमार अंगरवार,अब्दुल खालेद,सुवेश पोकलवार यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या वतीने देण्यात आले निवेदन
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट) च्या वतीने ही एका शिष्टमंडळाने निवेदन दिले असून त्यावर राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर,डी.बी.जांभरुणकर, माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,तालुका अध्यक्ष ॲड.शिवाजीराव कदम, तालुका महिला अध्यक्षा सौ.यशोदाताई शेळके,शहर अध्यक्ष दत्तात्रय पांचाळ,दिलीपराव तिवारी,आनंदराव चिट्टे,ॲड.भुजंगराव सूर्यवंशी ॲड.लक्ष्मीकांत मोरे,माजी नगरसेवक खाजा तौफिक इनामदार,आनंदराव पाटील बोरगावकर,मोहनराव पाटील हसापूरकर,रामलु गोदेवाड,मारोती शेंडगे,गणपतराव मुसळे,माजी नगरसेवक शेख वकील शेख खैराती,संदीप गंगासागरे, संजय पाटील भोसले,चेतन पाटील हाडोळीकर,उमेश पाटील कापसे,बालाजी तेलंग,मिर्झा इसाक बेग,शेख अजिजसाब,शाकेर इनामदार,नब्बु भाई,अविनाश सुर्यवंशी,विकी शेळके,श्याम जैन,संजय पाटील भोसले,संजय पाटील मुरगूलवार,कोंडीबा कोकणे,चेतन पाटील महागावकर यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या वतीने देण्यात आले निवेदन
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(अजित पवार गट) वतीने इंजि.विश्वंभर पवार यांच्या नेतृत्वाखाली ही एका शिष्टमंडळाने निवेदन दिले असून त्यावर जिल्हा उपाध्यक्ष शेख जवाजोद्दीन बरबडेकर,भोकर शहराध्यक्ष डॉ.फेरोज खान इनामदार, तालुका सचिव रवी गेन्टेवार, तालुका उपाध्यक्ष आनंद पाटील सिंधीकर, तालुका कोषाध्यक्ष बालाजी पाटील गौड,तालुका संघटक संजय पाटील,युवक तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार,युवक शहराध्यक्ष अफरोज खान पठाण,मुखेड विधानसभा अध्यक्ष चौधरी,भोकर विधानसभा सचिव विशाल जैन महाजन,भोकर महिला शहराध्यक्ष चंद्रकलाबाई गायकवाड,शशिकांत पाटील क्षीरसागर,अर्धापूर माजी तालुकाध्यक्ष अमोल पाटील रुईकर,डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ.विजय बोंधीलवाड,उद्योग व्यापारी आघाडी अध्यक्ष कल्याणे,बालाजी पाटील सांगवीकर, महबूब बुर्हान,हनुमंत नटुरे मुदखेड,पंकज देशमुख भोसीकर,सिद्धेश्वर पाटील ढवळे, बाळासाहेब पाटील येलुरे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष योगेश पाटील काळेवार,खुद्दुस कुरेशी,आशिष अनंतवार यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन
तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने निवेदन दिले असून त्यावर जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख, तालुका प्रमुख माधव पाटील वडगावकर,तालुका संघटक संतोष आलेवाड,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,माजी जि.प.सदस्य सुनिल चव्हाण,वामन किशनबुवा पर्वत,मारोती अनंतराव पवार,रमेश बालाजी यशवंतकर,नागेश पिटलेवाड,रामेश्वर भुरे,वधुता नामेवाड, सोहम शेट्टे,गजानन तवर,गजानन जाधव,विठ्ठल गाडेकर,संदेश गाडेकर,गंगाधर माहादवाड यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.