‘त्या’ चित्रफितीमुळे भोकरमध्ये उबाठा शिवसेनेने सोमय्यांच्या प्रतिमेस मारले जोडे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांची नागडी अश्लील चित्रफीत (व्हायरल व्हिडिओ) एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली. यामुळे या नेत्यांच्या लंपट कृत्याने राज्यात एकच खळबळ उडाली असून महिला सन्मान आणि चारित्र्य सुरक्षिततेसह हे खेदजनक असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमय्यांच्या प्रतिमेस जोडे मारुन तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.तसेच या कृत्याची तात्काळ चौकशी करुन सोमय्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफीत एका मराठी वॄतवाहिनीने प्रसारीत केली असून त्यांच्या या कृत्याने महाराष्ट्रातील जन सामान्यात संतापाची लाट उसळली आहे.सदरील कृत्याने भाजपाच्या या नेत्याचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून इतरांवर नको ते आरोप करने,गुन्हे दाखल करुन सळो की पळो करणारा हा नेता महिलांचा सन्मान करुच शकत नाही,अशी संतप्त भावना ‘त्या’ चित्रफितीमुळे जनसामान्यांतून व्यक्त होत आहे. सोलापुर,परभणी येथील घटनांनंतर किरीट सोमय्या यांच्या या कृत्याने अश्लीलतेचा कळसच गाठल्याचे बोलल्या जात आहे.या अपप्रवृतीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.याच अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दि.१८ जुलै २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,भोकर येथे किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.तसेच या कृत्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.
सदरील जोडे मारो व निषेध आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सतिष देशमुख,तालुका प्रमुख माधव वडगावकर,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण,नंदु पाटील कवठेकर, मनोहर साखरे,मारोती पवार,संभाजी पोगरे,सोहम शेट्टे,नागेश पिटलेवाड,रमेश यशवंतकर,सुनील जाधव,दिपक मेटकर,जगदिश गडदे,किशन गायकवाड,अनिल बनसोडे,गज्जू मेटकर,व्यंकटेश सोनवडे,महिला आघाडीच्या आनंदाबाई चुनगूरवाड,लक्ष्मण शितोळे,मोहन भाडेवाढ,सुरेश शेळके सुनिल नरवाडे,राम भुरे, पवन चुनगूरवाड यांसह अनेक शिवसैनिक सहभागी होते.