१०५ रक्तदात्यांच्या रक्तदानाचे भोकरमध्ये डॉ.शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : जलक्रांतीचे प्रणेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांची जयंती लोकोपयोगी उपक्रमाणे केली साजरी.
भोकर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय व स्व.डॉ. शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर कार्यालयात स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करुन काँग्रेस पक्ष कमिटीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांसह आदींनी सामुहिक अभिवादन केले.तद्नंतर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा मैदानातील व्यापारी लिलाव शेडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.या शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,जि.प.चे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,माजी उपनगराध्यक्षा प्रतिनिधी शेख युसुफ,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,युवक काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अत्रिक पाटील मुंगल यांसह आदींनी रक्तदान करून स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.तसेच काँग्रेस पक्षाच्या भोकर तालुका व ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व युवकांनीही रक्तदानात सहभाग नोंदविला.जवळपास १०५ दात्यांनी रक्तदान करुन डॉ.शंकरराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली व अशा प्रकारे लोकोपयोगी उपक्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. या रक्तदान शिबिरात स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड येथील रक्तपेढी च्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनासाठी परिश्रम घेऊन दात्यांचे रक्त संकलित केले.
संपन्न झालेल्या या शिबिरास महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आनिता इंगोले,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा कळसकर ताई,नांदेड जि.प.च्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी जि.प.सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर,माजी नगराध्यक्ष डाॅ. विजय कुमार दंडे,सौ.संगीता विनोद चिंचाळकर, साहेबराव सोमेवाड,उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक उज्वल केसराळे,गणेश राठोड,केशव पाटील पोमनाळकर,कृष्णा वागतकर,सारंग मुंदडा,राजु अंगरवार,रामचंद्र मुसळे,सय्यद खालेद,काँग्रेसचे शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार,डाॅ.राम नाईक,बाबुराव पाटील आंदबोरीकर,विक्रम क्षीरसागर, अल्पसंख्याक कमिटीचे तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग, सेवादलचे तालुकाध्यक्ष संजय बरकमकर,फारुख करखेलीकर,आदिनाथ चिंताकुटे,यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी,शहर काँग्रेस कमिटी,तालुका युवक काँग्रेस कमिटीने व सर्व सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.