मा.आ.राजूरकर यांच्यावर भोकरची जबाबदारी;नुतन तालुकाध्यक्षांनी पक्ष बळकटीसाठी घेतली भरारी
काँग्रेस पक्ष कमिटीचे नुतन तालुकाध्यक्ष भगवान दंडवे व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्रिक मुंगल यांनी तीर्थक्षेत्र पाळज येथून पक्ष बळकटीसाठीचा केला श्रीगणेशा…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील भोकर तालुक्यातील काँग्रेस पक्ष व कार्यकर्ता संघटनशक्ती वाढीसाठी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावर भोकर तालुक्याचे प्रभारी पालक म्हणून जबाबदारी सोपवली. यानंतर त्यांच्याच पुढाकारातून काँग्रेस पक्ष कमिटीचा भोकर तालुकाध्यक्ष नियुक्तीचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आला व ओबीसी चेहरा म्हणून भगवान दंडवे यांची नुतन तालुकाध्यक्ष पदी आणि युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदी आत्रिक मुंगल पाटील यांची नियुक्ती तीर्थक्षेत्र पाळज ता.भोकर येथे दि.१० जुलै रोजी घोषित करण्यात आली असून येथील श्री गणेश मंदिरात नारळ फोडून पक्ष बळकटीसाठी बुथ कमिटी सक्षमीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर हे विराजमान होते.त्यांच्या जागी ओबीसी समाजातील कार्यकर्त्यास नियुक्त करण्यात यावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांच्याकडे भोकर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांकडून होत होती.ही मागणी प्रलंबित असतांना भोकर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्ष वाढ व बळकटीसाठी आ.अशोक चव्हाण यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावर भोकर तालुक्याचे प्रभारी पालक म्हणून जबाबदारी सोपवली.दरम्यानच्या काळात कार्यकर्ता संघटनशक्ती वाढीसाठी पक्षांतर्गतच्या अल्पसंख्याक विभाग काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मिर्झा ताहेर बेग,सेवादल तालुकाध्यक्ष पदी संजय बरकमकर यांची फेर नियुक्ती करण्यात आली.तर फादर बॉडीच्या तालुकाध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया रखडल्याने अतंर्गत गटातटात ओढाताण सुरू झाली होती.जातीय समीकरण पाहता ओबीसी समाज कार्यकर्त्यांची भोकर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी या मागणीने जोर धरला होता.ही बाब लक्षात घेऊन आ.अशोक चव्हाण यांच्या आदेशाने राजकीय दीर्घानुभव असलेल्या व संघटन कुशल अशा कार्यकर्त्यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आणि भगवान दंडवे यांची नुतन तालुकाध्यक्ष पदी वर्णी लागली.या नियुक्ती ची घोषणा दि.१० जुलै २०२३ रोजी तीर्थक्षेत्र पाळज ता.भोकर येथे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केली.युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद ही गेल्या काही वर्षांपासून रिक्त होते. या पदासाठी बेंबर ता.भोकरचे सरपंच प्रतिनिधी आत्रिक मुंगल पाटील यांची वर्णी लागली व याच ठिकाणी त्यांची पण युवक काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे घोषित करण्यात आले.तसेच काँग्रेस पक्ष महिला कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर,विधानसभा अध्यक्ष मारोती पाटील शंकतिर्थकर,महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अनिताताई इंगोले,महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर,उपसभापती बालाजी शनामवाड,माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर, माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार,ओबीसी नेते नामदेव आयलवाड,सरपंच संघटना तालुकाध्यक्ष माधवराव अमृतवाड, संचालक रामचंद्र मुसळे,संचालक उज्वल केसराळे,संचालक गणेश राठोड,संचालक आनंदराव देशमुख, संचालक राजु अंगरवार,माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड,बाबुराव सायलकर,अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,बाबूराव पाटील आंदबोरीकर,डॉ.मनोज गीमेकर,डॉ.बालाजी बिल्लरवार, संदिप पाटील कोंडलवार,विनोद चव्हाण चिदगिरीकर, गोविंद मेटकर,फारुख शेख करखेलीकर, आदिनाथ चिंताकुटे,विठ्ठल पाटील धोंडगे,सुभाष चटलावार,गणेश गडमवाड,सुरेश चटलावार,गणेश रेड्डी, श्यामसुंदर रेड्डी, सत्यम रेड्डी,यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उपरोक्त सर्व उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री गणेश मंदिरात नारळ फोडण्यात आले व बुथ कमिटी सक्षमीकरणाचा श्रीगणेशा ही करण्यात आला.नुतन तालुकाध्यक्ष भगवान दंडवे व युवकचे नुतन तालुकाध्यक्ष आत्रिक मुंगल पाटील यांच्या नियुक्तीचे भोकर शहरात ढोल ताशा व आतिशबाजिने भव्य स्वागत करण्यात आले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.तर दोन्ही तालुकाध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही कदापिही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली असून नियुक्तीनंतर मा.आ.अमरनाथ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत दररोज भोकर तालुक्यातील गावभेटींसह बुथ कमिटी सक्षमीकरण मोहीम हाती घेतली आहे.
