प्र.उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांची भोकर उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : जवळपास गेल्या ११ महिन्यांपासून तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार असलेल्या भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयास एक उच्च शिक्षित अधिकारी मिळाला असून प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांनी भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्विकारला आहे.
उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांची दि.४ ऑगस्ट २०२२ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखालील मंत्रालयीन कार्यालय, सचिवालय मुंबई येथे अवर सचिव म्हणून बदली झाल्यापासून भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रभारी पदभार कधी भोकर तर कधी मुदखेड च्या तहसिलदार यांच्याकडे होता.सदरील कार्यालयास वरिष्ठ दर्जाचा व कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने अनेकांना समस्यांशी सामोरे जावे लागत होते.तर अनेकांची कामे ही खोळंबली आहेत.त्यात अधिक भर म्हणजे भोकर नगर परिषदेच्या प्रशासकाची जबाबदारी देखील याच अधिका-यांवर असल्याने व सक्षम अधिकारी तेथे नसल्याने भोकर शहरातील अनेक नागरिकांची कामे देखील खोळंबली आहेत.तुर्तास भोकर नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून भोकर तहसिलदार यांच्याकडे पदभार आहे. परंतू तहसिलदार व मुख्याधिकारी या दोन पदांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असल्याने ते भोकर शहरातील समस्या सोडविण्यासाठी अपुरे ठरत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या सन २०१९ च्या परिक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून उत्तीर्ण झालेले तसेच ज्यांनी तहसिल कार्यालय कंधार ता. कंधार जि.नांदेड येथे तहसिलदार व कंधार नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी कालावधीचा पदभार ऑक्टोबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत यशस्वी आणि उत्तम प्रकारे पुर्ण केला आहे.असे एक उच्च शिक्षित अधिकारी असलेल्या प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव यांची प्रशिक्षणार्थी कालावधी पुर्णत्वास येईपर्यंत भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी म्हणून दि.३० जून २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्विकारला असून एक उच्च शिक्षित अधिकारी येथे रुजू झाल्याने अनेकांतून समाधान व्यक्त होत आहे.तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून प्रशिक्षणार्थी कालावधी जरी असला तरी त्यांच्या हातून भोकर उपविभागातील तालुक्यातील नागरिकांचे प्रलंबित कामे पुर्णत्वास येतीलच अशी अपेक्षा येथील नागरिकांतून व्यक्त होत आहे.याच बरोबर त्यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी पुर्णत्वास आल्यानंतर त्यांची किंवा अन्य उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांची भोकर उपविभागीय अधिकारी पदी कायमस्वरूपी नियुक्ती व्हावी,तरच येथील प्रलंबित कामे पुर्णत्वास येतील,असे ही बोलल्या जात आहे.
🌹🌸🌹प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी अनुपसिंग यादव हे एक अभ्यासू, नागरिकांच्या समस्यांची जाण असणारे कर्तव्यदक्ष तरुण अधिकारी असल्याचे कंधार येथील नागरिकांतून सांगण्यात येत असून त्यांची प्र.भोकर उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संपादक उत्तम बाबळे व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक स्वागत आणि पुढील सेवाकार्यासाठी त्यांना अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा! 🌹🌸🌹