विटवाहू टेंपो व मॅजिकच्या भिषण अपघातात ५ जण ठार तर ८ जखमी
भोकर – नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भोकर जवळील सिताखांडीत घाटात झाला हा अपघात
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भोकर जवळील शिताखांडी घाटात दि.१९ जून रोजी भरधाव विटवाहू टेम्पोने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिकला उडविले. समोरासमोरुन झालेल्या या भिषण अवेगातील पघातात ५ जण ठार व ८ जण जखमी झाले आहेत.तर या दुर्दैवी मयतात हळदा ता.भोकर येथील एका होतकरू तरुण पत्रकाराचा ही समावेश आहे.
नांदेड येथून प्रवासी घेऊन भोकरकडे येत असलेले मॅजिक वाहन क्र.एम.एच.२६ बी.एक्स.३८१५ हे भोकर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील भोकर जवळील सिताखांडी घाटात आले असता भोकर कडून नांदेडकडे भरधाव वेगात जात असलेल्या विटवाहू टेंपो क्र.एम.एच.१९ एस.४९९३ ने त्या मॅजिकला उडविले. समोरासमोरुन झालेल्या धडकेच्या ह्या भिषण अपघातात संदिप किशनराव किशवे(२६, पत्रकार)रा.हळदा ता.भोकर,संजय ईरबा कदम (४७) रा.दिवशी खु.ता.भोकर, बापुराव रामसिंग राठोड (६५) रा.पाकी धुळदेव ता.भोकर,अहेमदाबी (४०) रा.भोकर, भुलाबाई गणेश जाधव (४०) रा.पोटा तांडा ता.हिमायतनगर ह्या पाच जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर शार्दुल मिंया (४५) रा. भोकर,शोभाबाई गणेश ढवळे(५५) रा.भोकर,देविदास गणेश जाधव(२७)रा.पोटा तांडा ता.हिमायतनगर,मंगेश गोविंद डुकरे( ) रा.लहान ता.अर्धापूर,कैलास गणपत गड्डमवाड(४५)रा.सिरंजनी ता. हिमायतनगर,परमेश्वर केशव महाजन(४०)रा.विरसणी ता. हिमायतनगर व अन्य दोघे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

अपघातातील काही जखमिंना अधिक उपचारार्थ नांदेड येथे तात्काळ नेण्यात आले,तर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात काही जणांवर प्रथमोपचार करुन अधिक उपचारार्थ त्यांची नांदेड येथे रवानगी करण्यात आली आहे.सदरील भिषण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस चौकी बारड ता. मुदखेडचे पो.उप.नि.यलगुलवार,पो.उप.नि.कवळे,सहा.पो.उप.नि. गणी,जमादार श्रीनिवास,जमादार धामेकर,जमादार शेख,पो.कॉ. अवातिरक,मदतनिस प्रल्हाद शिंदे बारडकर व भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.नानासाहेब उबाळे,सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव, सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे सहा.पो.उप.नि.संभाजी हणवते,सहा.पो.उप.नि. नागरगोजे,जमादार क्षिरसागर,पो.काॅ. परमेश्वर कळणे,पो.काॅ.ज्ञानेश्वर सरोदे,सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल यांसह आदींचा ताफा घटनास्थळी पोहचला.हा अपघात एवढा भिषण तथा हृदय हेलावून टाकणारा होता की, घटनास्थळी मयत व जखमींच्या रक्ताचा सडा पडला होता.तर मयत व काही जखमी हे चेंदामेंदा झालेल्या मॅजिक वाहनात अडकून पडलेले होते.यावेळी पोलीसांनी तेथे जमलेल्या नागरीकांच्या मदतीने व गॅस कटरने मॅजिकचा पत्रा कापून काढला आणि अडकलेल्या जखमींसह मयतांचे मृतदेह बाहेर काढले.तसेच काही जखमींची पुढील उपचारासाठी तात्काळ नांदेड येथे रवानगी केली व काही जखमी आणि दुर्दैवी मयतांचे मृतदेह भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले.यावेळी मयत व जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली आणि मोठा हंबरडा फोडल्याने रुग्णालय परिसरात सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले होते.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण,वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुरी कलेटवाड,डॉ.सागर रेड्डी,डॉ.गणेश जंगीलवाड,डॉ.कार्था रेड्डी, परिचारीका संगीता ताटेवाड,सुनील चरण,मल्हार मोरे, रुग्णवाहिका चालक रवी वाठोरे,मनोज पांचाळ यांसह आदींनी जखमींवर प्रथमोपचार केले.तर अपघाताचा पंचनामा व गुन्हा दाखल करणे आणि मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.ह्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,भोकर चे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना (आयपीएस) यांनी घटनास्थळी व शासकीय ग्रामीण रुग्णालयात भेट दिली.तसेच जखमींच्या प्रकृतीची विचारपुस करुन मयतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आणि त्या वाहनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याच्या भोकर पोलीसांना सुचना दिल्या.
वयबाह्य विटवाहू टेंपो व जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आळा बसेल काय?
वयबाह्य व कालबाह्य झालेल्या विटवाहू टेंपो आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनाचा माघील वर्षी भोकर-किनवट महामार्गावर भिषण अपघात झाला होता.यात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.हे स्मरणात असतांनाच दि.१९ जून रोजी पुन्हा एकदा विट वाहू टेंपो व प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक वाहनाचा सिताखांडी घाटात हा भिषण अपघात झाला असून निष्पाप प्रवास्यांना जीव गमवावा लागला आहे.या दोन्ही घटना पाहता वय व कालबाह्य झालेले विट वाहू टेंपो आणि भरगच्च प्रवासी भरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहतूकीसाठी सर्रास वापर होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे.अशा प्रकारे जीवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे व आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.परंतू संबंधित राज्य परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाचे या बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.त्यामुळेच अनेकांना अशा प्रकारच्या अपघातात जीव गमवावा लागत आहे असे चर्चील्या जात आहे.म्हणून अशा प्रकारच्या वाहनां विरुद्ध कारवाई व्हायलाच पाहिजे आणि वाहतूकीवर आळा घालणे ही गरजेचे असल्याने संबंधित अधिकारी हे काही ठोस कारवाई करण्याचे धाडस दाखवितील काय ? असा प्रश्न पडल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
उदयोन्मुख तरुण पत्रकार संदीप किसवे यांचा ही या भिषण अपघातात झाला दुर्दैवी मृत्यू

हळदा ता.भोकर येथील उदयोन्मुख तरुण पत्रकार संदीप किसनराव किसवे(२६) यांचा ही ह्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.पत्रकार संदिप किसवे यांनी पत्रकारिता विषयात पदवी प्राप्त केली होती.यानंतर ग्रामीण भागातील जनतेच्या न्याय हक्कासाठी खडे बोल या समाज माध्यम वृत्तवाहिनीतून नुकतीच त्यांनी पत्रकारिता सुरु केली होती.एका उदयोन्मुख,सृजनशील,होतकरू तरुण पत्रकाराचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने भोकर तालुक्यातील ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या अकस्मित जाण्याने गाव व तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातातून हळहळ व्यक्त होत आहे.मयत पत्रकार संदीप किसवे यांच्या व सर्व मयतांच्या परिवाराच्या दुःखात भोकर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव सहभागी असून या दुर्दैवी मयतांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.