अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या अवमान करणार्यांवर कठोर कार्यवाही करा
विविध सामाजिक संघटनांची मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्थापित असलेल्या राष्ट्रीय थोर लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व स्त्री शिक्षणाची जननी माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून जाणीवपूर्वक अवहेलना करण्यात आलेली कृती ही तीव्र निषेधार्य असून केवळ हिंदुत्ववादीयांचे उदात्तीकरण करण्यासाठीच हा प्रकार केलेला आहे,त्यामुळे अशा प्रकारे राष्ट्रमातांची अवहेलना करण्याचे कृत्य करणार्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत केली आहे.
महाराष्ट्र सदनातील झालेल्या सदरील अवमान प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने निव्वळ दिलगिरी व्यक्त करून न थांबता,त्या समाजकंठकी प्रवृत्तीना पायबंद करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.वीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी म्हणून सरकारच्या वतीने महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात सन्मानपूर्वक उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकमातांचे पुतळे अवमानकरित्या हटवून सावरकरांच्या जयंतीचा घाट घालत उघडपणे पुतळ्यांची अवहेलना नव्हे तर अवमानच करण्यात आला आहे.तसेच दि.३० मे २०२३ रोजी ’इंडिका टेल्स’ या वेबसाईटवरून स्त्री शिक्षणाच्या जननी थोर समाजसेविका राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून थोर राष्ट्रमातेची महाराष्ट्रात जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रकार ही घडला आहे.ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या सुकन्या सावित्रीबाई फुले यांच्या थोर कार्याला कलंकित करणारी आहे.वरील दोन्ही घटनांची शासनामार्फत सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करावी, अन्यथा विद्यमान सरकारचा अशा समाजकंठकी व राष्ट्रविरोधी अपप्रवृत्तीच्या लोकांच्या कृतीला अप्रत्यक्ष छुपा पाठिंबा व समर्थनच असल्याची धारणा पक्की विचार अनुयायींनी होईल.तात्काळ वरील मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,असा इशारा सदरील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदरील दोन्ही घटनांचा आज दि.३१ हे २०२३ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.तसेच एका शिष्टमंडळाने राज्याचे एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे वरीलप्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.या शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे,मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर,समता ग्रुपचे प्रमुख इंजि.एस.पी.राके,भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद थोटवे,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे एन.डी.रोडे,विठ्ठल घाटे,नागराज आईलवार,आनंद वंजारे,शिवाजी नुरूंदे,नागेश तादलापूरकर,सोनाजी कांबळे यांसह आदींचा समावेश होता.