Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

प्राचार्य डॉ.बळीराम गायकवाड यांना पितृ शोक

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील मौ.पिंपळढव येथील जेष्ठ नागरिक नामदेवराव विठ्ठलराव गायकवाड (७१) यांचे नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दि. २२ मे २०२३ रोजी पहाटे २:४० वाजता अल्पशा: आजारात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि.२२ मे २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मौ.पिंपळढव येथील हिंदू दहनभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.ते प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी,मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव तथा मुंबई विद्यापीठातील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक,महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सन्माननिय सदस्य,एमजीडी परिवाराचे मार्गदर्शक,उरण येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बळीराम गायकवाड,बालाजी गायकवाड ही दोन मुले,मुलगी,सुना,जावई, नातवंडे,भाऊ हडको नांदेड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव गायकवाड,भावजया,पुतणे पिंपळढवचे पोलीस पाटील शिलानंद गायकवाड, नागेश गायकवाड यांसह मोठा परिवार आहे.

शोकाकुल वातावरणात झालेल्या अंत्यसंस्कार समयी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा साहित्यिक शिवा कांबळे,प्रा.जी.एल.सुर्यवंशी, अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जळबाजी गायकवाड,झुंजारे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करुन भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. तर यावेळी प्रा.डॉ.माधव बसवंते,भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक नेते मारोती वाडेकर,मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ तथा सामाजिक नेते राम चव्हाण,सामाजिक नेते एच.पी.कांबळे,सोनू दरेगावकर,एन.जी.पोतरे,के.वाय. देवकांबळे, संजय गोटमुखे,सतिश सुगावकर यांसह नातेवाईक,गावकरी,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.तर बार्टी पुणेचे महासंचालक तथा एमजीडी चे नेते सुनील वारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार राम गुंडूले,माजी आमदार सुधाकर भालेराव,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,मांस संघटनेचे नेते राजाबाई सुर्यवंशी,लोकस्वराज्य आंदोलनचे नेते प्रा.रामचंद्र भरांडे,यांसह राज्यातील अनेक मान्यवरांनी डॉ. बळीराम गायकवाड व गायकवाड परिवाराचे फोन करुन सांत्वन केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !