स्व.माधव कदम पाटील मातूळकर अनंतात विलीन
भोकर येथील पत्रकार बालाजी कदम पाटील यांना बंधू शोक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मौ.मातूळ ता.भोकर येथील प्रतिष्ठित शेतकरी माधव बळीराम कदम पाटील(४१) यांचे दि.११ मार्च रोजी अल्पश: आजारी उपचारा दरम्यान नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात पहाटे ५:५० वाजता दु:खद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर गावी मौ.मातूळ येथे दुपारी २:३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका भोकरचे कोषाध्यक्ष पत्रकार बालाजी कदम पाटील मातूळकर यांचे ते द्वितीय बंधू होत.
मौ.मातुळ येथील शेतकरी माधव बळीराम कदम पाटील यांना रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी अचानकपणे अस्वस्थता वाटू लागल्याने उपचारार्थ त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथील उपचारास यश आले नसून उपचारा दरम्यान दि.११ मार्च २०२३ रोजी पहाटे ५:५० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे पार्थिव मौ.मातूळ येथे आणण्यात आले व दुपारी २:३० वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात वडील,दोन भाऊ,दोन बहिणी,पत्नी,दोन मुले,मेव्हुणे,भावजया,पुतणे,पुतणी असा मोठा परिवार आहे.अंत्यसंस्कार समयी नातेवाईक,आप्तेष्ट,शेतकरी,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती,पत्रकार बांधव यांसह अनेकांची उपस्थिती होती.त्यांच्या अकाली जाण्याने कदम पाटील परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे व भोकर तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांची स्व.माधव कदम पाटील यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!