भोकर येथून पो.नि. विकास पाटील यांची वजिराबाद नांदेड येथे बदली
तर पो.उप.नि.अनिल कांबळे यांची (हदगाव), पो.उप.नि. दिगंबर पाटील(अर्धापूर) व सुर्यकांत कांबळे यांची(मनाठा) येथे ही झाली बदली
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दि.१८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सेवारत ९ पोलीस निरीक्षक,२० सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४५ पोलीस उप निरीक्षक यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील,पो.उप.नि.अनिल कांबळे,पो. उप.नि. दिगंबर पाटील व पो.उप.नि.सुर्यकांत कांबळे यांचा या बदलीत समावेश आहे.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाशिवरात्री दिनी दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील १८ पोलीस निरीक्षक,२० सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४५ पोलीस उप निरीक्षक यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.यात भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष तथा न्यायप्रिय दबंग पो.नि.विकास शेकूजी पाटील यांची पोलीस ठाणे वजिराबाद,नांदेड येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सायबर सेल,नांदेड येथून पोलीस निरीक्षक नानासाहेब ज्ञानदेव उबाळे हे बदलीवर येत आहेत.तर पो.उप.नि. अनिल विठ्ठलराव कांबळे यांची पोलीस ठाणे हदगाव येथे,पो.उप.नि.दिगांबर पांडूरंग पाटील यांची पोलीस ठाणे अर्धापूर येथे व पो.उप.नि.सुर्यकांत मारोती कांबळे यांची पोलीस ठाणे मनाठा ता.हदगाव येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस ठाणे हदगाव येथून पो.उप.नि.नागोराव विठ्ठलराव मोरे व पोलीस ठाणे अर्धापूर येथून पो.उप.नि. साईनाथ काशिनाथ सुरवसे हे भोकर येथे येत आहेत.

पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची पोलीस ठाणे किनवट येथून भोकर येथे बदली झाली व दि.२६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी भोकर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला व दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची भोकर येथून बदली झाली आहे.भोकर येथे तब्बल ४ वर्ष प्रदीर्घ कर्तव्य सेवा बजावलेले पो.नि. विकस पाटील यांनी दरम्यानच्या काळात अनेक गंभीर गुन्हे हाताळली असून गुन्हेगारांचे कर्दनकाळ व अन्यायग्रस्त पिडीतांचे ते न्यायदाते ठरले आहेत.तसेच कोरोना प्रादुर्भाव कार्यकाळात पोलीस कर्तव्यासह मानवतेच्या भावनेतून उत्तम जनसेवा बजावली आहे. त्यांचा येथील सेवाकार्यकाळ अनेकांच्या स्मरणात राहणारी आहे.तर पो.उप.नि.अनिल कांबळे यांनी दि.२९ डिसेंबर २०१९ रोजी,तर पो.उप.नि.दिगांबर पाटील यांनी दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी व पो.उप.नि. सुर्यकांत कांबळे यांनी दि.२० आक्टोंबर २०२० रोजी भोकर पोलीस ठाण्यात पदभार स्विकारला.या तिघांनीही दरम्यानच्या काळात पो.नि.विकास पाटील यांच्या खांद्याला खांदा लाऊन कायदा,शांतता व सुव्यवस्था यासाठी चोख सेवा कर्तव्य बजावले.या चौघांचे ही भोकर येथील सेवाकर्तव्यातील योगदान अनेकांच्या कामी आले असून ते अविस्मरणीय राहणार आहे.उपरोक्त सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली असून पुढील सेवाकार्यासाठी त्यांना अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!