राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा महासचिव पदी संपादक उत्तम बाबळे
तर भोकर तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड व कार्याध्यक्षपदी गंगाधर पडवळे यांची नियुक्ती
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : देश व राज्य पातळीवर सेवारत असलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या मराठवाडा महासचिव पदी संपादक उत्तम बाबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच भोकर तालुका नुतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या कार्यकारणीच्या तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड यांची व तालुका कार्याध्यक्षपदी गंगाधर पडवळे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.तर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा कार्यालयात राज्य कार्याध्यक्ष प्रा.दशरथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड, मराठवाडा अध्यक्ष अशोक वायवळ,नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर,नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे,जिल्हा उपाध्यक्ष संजय राक्षे,जिल्हा महासचिव प्रकाश कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीत संस्थापक अध्यक्ष विजयजी सुर्यवंशी व राज्याध्यक्ष संतोष जाधव यांच्या सहमतीने आणि उपस्थितांच्या सर्वानुमते सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले आणि अन्याय अत्त्याचारा विरुद्ध लढणारे निर्भिड अभ्यासू व्यक्तिमत्त्व संपादक उत्तम बाबळे यांची मराठवाडा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड यांच्या अध्यक्षतेखाली व उपरोक्त मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची भोकर तालुका नुतन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली आहे.सदरील कार्यकारिणी पुढील प्रमाणे…तालुकाध्यक्ष-जेष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड,तालुका कार्याध्यक्ष -गंगाधर पडवळे, उपाध्यक्ष – कमलाकर बरकमकर,विजय चिंतावार, महासचिव – आर.के.कदम,सहसचिव -विठ्ठल सुरलेकर,कोषाध्यक्ष-बालाजी कदम पाटील,सह कोषाध्यक्ष- गजानन गाडेकर,संघटक – शुभम नर्तावार,सहसंघटक – विशाल जाधव व समन्वयक – सुधांशू कांबळे आणि सदस्य पदी निळकंठ पडवळे, अंबादास बोयावर,श्रीकांत बाबळे यांसह आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपन्न झालेल्या या बैठकीत सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करुन भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विविध स्तरातून ही अभिनंदन होत आहे.